राजकोट Ben Stokes Demand ban on Umpires call : राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या कसोटीत (India vs England) भारतीय संघानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला होता. या मालिकेतील इंग्लंडचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. यापूर्वी विशाखापट्टणम इथं झालेल्या कसोटीतही इंग्लिश संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता राजकोटमधील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं डीआरएस प्रणालीच्या 'अंपायर कॉल'वरच प्रश्न उपस्थित केले आहेत. (Zak Crawley)
क्रॉलीला बाद दिल्यावरुन वाद : सामना झाल्यानंतर बोलताना इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) म्हणाला की, डीआरएस प्रणालीमधील 'अंपायर कॉल' काढून टाकला पाहिजे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात झॅक क्रॉलीला वादग्रस्त बाद दिल्यानंतर स्टोक्सनं डीआरएसमधून 'अंपायर कॉल' काढून टाकण्याची मागणी केलीय. क्रॉलीविरुद्ध बुमराहनं पायचीत (LBW) चं अपील केलं होतं. त्यानंतर मैदानावरील अंपायरनं त्याला बाद दिलं होतं. यानंतर क्रॉलीनं अंपायरच्या निर्णयाला आव्हान दित रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये रिप्लेनं दाखवलं की चेंडू स्टंपला लागला नाही, परंतु तरीही तो 'अंपायर कॉल' मानला गेला आणि क्रॉलीला क्रीज सोडत तंबूत परतावं लागलं.
काय म्हणाला बेन स्टोक्स : इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हे क्रॉलीच्या विकेटबाबत मॅच रेफरीकडेही गेले होते. सामन्यानंतर बोलताना क्रॉलीच्या विकेटवर स्टोक्स म्हणाला, "रिप्लेमध्ये चेंडू स्टंपच्या बाहेर जाताना स्पष्टपणे दिसत होता. मात्र तो 'अंपायर कॉल' मानला गेला, तेव्हा आम्ही थोडं गोंधळलो. अंपायर म्हणाले की, नंबरप्रमाणे तो चेंडू स्टंपवर गेला असता. पण प्रोजेक्शन चुकीचं होतं. याचा अर्थ मला माहित नाही."
अंपायक कॉल काढून टाकण्याची मागणी : स्टोक्स पुढं म्हणाला, "मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की 'अंपायर कॉल' काढून टाकलं पाहिजे. जर चेंडू स्टंपवर जात असेल तर तो स्टंपवर जात असेल, पण खेळाचं मैदान प्रत्येकासाठी समान असले पाहिजे." यापुर्वीही क्रकेटमध्ये अनेकदा डीआरएसमधील अंपायर कॉलमुळं अनेकदा वाद झाले आहेत. तसंच काही खेळाडूंनी हे तंत्रज्ञानच चुकीचं असल्याचं म्हणत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर काहींनी हे काढून टाकण्याचीही मागणी केलीय. त्यातच आता इंग्लिश कर्णधारानं पुन्हा एकदा यावर प्रश्न उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय.
हेही वाचा :