हरारे ZIM vs AFG 1st T20I : इंग्लंड क्रिकेट संघानं क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. सॅम कुरन आणि टॉम करन हे दोन्ही भाऊ इंग्लंड संघाकडून खेळतात. दोन्ही भावांनी देशासाठी अप्रतिम क्रिकेट खेळलं आहे. त्यांनी जगभरात नावही कमावलं आहे. दरम्यान, त्यांचा भाऊ बेन कुरनची दुसऱ्या देशाच्या संघात निवड झाली आहे. त्याचा झिम्बाब्वे संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी त्याचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
Get ready for an action packed holiday season as Zimbabwe take on Afghanistan in a tour featuring T20Is, ODIs, and Test matches in Harare and Bulawayo. 😍#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/4f3ojWGTvI
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 7, 2024
वडील झिम्बाब्वेसाठी क्रिकेट खेळायचे : सॅम कुरन, टॉम कुरन आणि त्यांचा मधला भाऊ बेन कुरन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळले असले तरी, बेन करन 2022 पर्यंत नॉर्थम्प्टनशायरकडून खेळला आहे, परंतु त्यानंतर तो झिम्बाब्वेला गेला. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी चमकदार कामगिरी केली आहे. प्रो50 चॅम्पियनशिप 2024/25 आणि लोगान कप 2024/25 प्रथम श्रेणी टूर्नामेंटमध्ये तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळं आता त्याची झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
Curran, Nyamhuri named in Zimbabwe’s limited-overs squads
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 9, 2024
Details 🔽https://t.co/RWDCybMDHY pic.twitter.com/G7g07pAmxk
झिम्बाब्वे क्रिकेटनं दिली माहिती : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात बहु-फॉरमॅट मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचं यजमानपद झिम्बाब्वे संघ करणार आहे. मात्र, बेनची केवळ वनडे संघातच निवड झाली आहे. तो T20 संघाचा भाग नाही. झिम्बाब्वे क्रिकेटनं एका निवेदनात लिहिलं की, 28 वर्षीय कुरननं देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आपलं स्थान निर्माण केलं आहे. तो माजी झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक दिवंगत केविन कुरन यांचा मुलगा आणि इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू टॉम आणि सॅम कुरनचा भाऊ आहे.
𝐏𝐫𝐞𝐩𝐬 𝐌𝐨𝐝𝐞 🔛
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 8, 2024
AfghanAtalan are underway with their preparations as they gear up for the three-match T20I series against Zimbabwe, starting this Wednesday in Harare. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/XS0Rtl9yKo
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, हरारे
- तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर, हरारे
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 17 डिसेंबर, हरारे
- दुसरा वनडे सामना : 19 डिसेंबर, हरारे
- तिसरा वनडे सामना : 21 डिसेंबर, हरारे
AfghanAtalan are off to Zimbabwe for an exciting all-format series! 🛫#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/5fH5z2doD9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 4, 2024
अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ :
T20 संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, ताकुडझ्वानाशे कैटानो, वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तादिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, तशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजारबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमैन न्यामुरी
वनडे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, बेन कुरन, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेव्हर ग्वांडू, टिनोटेंडा माफोसा, तादिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमैन न्यामुरी, विक्टर न्याउची, सिकंदर रजा, शॉन विलियम्स
हेही वाचा :