ETV Bharat / sports

13 तास फलंदाजी करत खेळली 141 षटकं; क्रिकेटच्या 'या' दिग्गजासमोर गोलंदाजांनी केलं होतं 'त्राहिमाम', 'डॉन'लाही करावी लागली 'बॉलिंग' - WI vs SA Test - WI VS SA TEST

West Indies vs South Africa Test :सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यात दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व दाखवत तब्बल 17 विकेट घेतल्या. मात्र एक फलंदाज असा होता त्यानं तब्बल 141 षटकं फलंदाजी केली होती. (west indies vs Saouth Africa test match)

West Indies vs South Africa Test
लिओनार्ड हटन (Getty and AFP)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 17, 2024, 7:51 PM IST

हैदराबाद West Indies vs South Africa Test : कसोटी हा क्रिकेटचा सर्वात लांब आणि मनोरंजक प्रकार आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट गेल्या होत्या. मात्र पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यात कधी कधी असं काही विचित्र घडतं ज्याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात एकीकडे एका दिवसात 17 विकेट गेल्या असताना, मात्र दुसरीकडे 86 वर्षांपूर्वीच म्हणजे 1938 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ओव्हल कसोटी सामन्यात इतिहास घडला होता. जेव्हा एका इंग्लिश फलंदाजानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं होतं. या इंग्लिश फलंदाजानं तब्बल 13 तासांपेक्षा जास्त वेळ खेळपट्टीवर घालवला आणि विक्रमी 847 चेंडू म्हणजेच सुमारे 141 षटकं फलंदाजी करताना 364 धावांची मोठी खेळी खेळली होती. या जबरदस्त खेळीची कहाणी अधिक बारकाईनं जाणून घेऊया.

13 तास फलंदाजी करत खेळली 141 षटकं : ही गोष्ट आहे इंग्लंडचा माजी क्रिकेटर लिओनार्ड हटनची, ज्यानं 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक चमत्कारी खेळी खेळली होती. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात हटननं अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन करत पहिल्या डावात 364 धावा केल्या. मोठी गोष्ट म्हणजे इतक्या धावा करण्यासाठी त्यानं तब्बल 847 चेंडू (141. षटके) खेळले, जे कसोटी सामन्याच्या एका डावात कोणत्याही फलंदाजानं खेळलेले सर्वाधिक चेंडू आहेत. एवढंच नाही तर हटन 797 मिनिटं (सुमारे साडे तेरा तास) क्रीजवर राहिला. हटनच्या या खेळीनं गोलंदाजांचे मनोधैर्य खचलं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केली होती वाईट अवस्था : लिओनार्ड हटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी (बिल एडरिक 187 धावा आणि जो हार्डस्टाफ नाबाद 169) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पूर्णपणे थकवलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या चक फ्लीटवुड स्मिथनं 87 षटकं गोलंदाजी करत आणि 298 धावा दिल्या. दुसरा सर्वात महागडा गोलंदाज बिल रेली होता, ज्यानं 85 षटकं टाकताना 178 धावा दिल्या. त्यानंच हटनला बाद करुन त्याची खेळी थांबवली. तर मर्विन वेटनं 72 षटकात 150 धावा दिल्या. विशेष म्हणजे गोलंदाजांची झालेली वाईट अवस्था अगदी डॉन ब्रॅडमनलाही बॉलिंग करायला यावं लागलं. ब्रॅडमननं 2.2 षटकात 6 धावा दिल्या. मात्र, त्यांना एकही विकेट मिळाली नाही.

इंग्लंडनं उभारली होती सर्वात मोठी धावसंख्या : लिओनार्ड हटनच्या 35 चौकारांसह 364 धावांच्या खेळीच्या जोरावर आणि बिल एडरिच-जो हार्डस्टाफ यांच्या शतकाच्या बळावर इंग्लंडनं पहिल्या डावात विक्रमी 7 बाद 903 धावांवार डाव घोषित केला. त्यावेळी कोणत्याही संघाकडून कसोटी डावात सर्वोच्च धावसंख्येचा हा विक्रम होता, जो श्रीलंकेनं 1997 मध्ये 952 धावा करुन मोडला होता. इंग्लंडच्या 903 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाजी बटू ठरली. दोन्ही डावांची मिळून त्यांची धावसंख्याही इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या निम्म्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कांगारुंचा संघ पहिल्या डावात 201 धावांत आणि दुसऱ्या डावात 123 धावांत गडगडला, त्यामुळं इंग्लंडनं हा सामना डाव आणि 579 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला. डाव आणि सर्वाधिक धावांच्या फरकानंही कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वात मोठा विजय आहे.

लिओनार्डची कारकीर्द कशी : लिओनार्ड हटनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं तर, त्यानं 1937 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1955 मध्ये शेवटचा सामना खेळला. केवळ कसोटी खेळणाऱ्या या दिग्गजानं 79 सामन्यांच्या 138 डावांमध्ये 56 पेक्षा जास्त सरासरीनं एकूण 6971 धावा केल्या. या काळात त्यानं 19 शतकं आणि 33 अर्धशतकंही झळकावली. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याच्या नावावर 40 हजार 140 धावा आहेत. ज्यात 129 शतकं आणि 177 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. मैदानांसाठी फ्लडलाइट्स घेणार भाड्यानं अन् काय तर म्हणे आम्हाला करायचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन - Champions Trophy 2025
  2. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा साता समुद्रापार जलवा... आक्रमक फलंदाजीनं संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Ajinkya Rahane

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.