ETV Bharat / sports

'कहां से आते हैं ये बॅट्समॅन...?' 85 मिनिटांतच मोडले दोन विश्वविक्रम - HIGHEST SCORE IN T20 CRICKET

T20 मध्ये एक इनिंग साधारणत: 85 मिनिटांची असते. सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये बडोद्याच्या 5 फलंदाजांनी मिळून असं काही केलं, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता.

Syed Mushtaq Ali Trophy
प्रतिकात्मक फोटो (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 5, 2024, 1:31 PM IST

इंदौर Syed Mushtaq Ali Trophy : बडोदा क्रिकेट संघानं मैदानावर अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी T20 क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडली नव्हती. बडोद्यानं T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे. एवढंच नाही तर बडोदा संघानं या सामन्यात अनेक नवे विक्रम केले आहेत. एकुणच बडोदा संघानं सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये अवघ्या 85 मिनिटांत 2 विश्वविक्रम मोडले आहेत.

बडोद्याच्या फलंदाजांनी 85 मिनिटांत इतिहास बदलला : भारताच्या देशांतर्गत T20 स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ब गटातील सामन्यात बडोद्याचा सामना सिक्कीमशी होत होता. अर्थात बडोद्याचा वरचष्मा आधीच होता. पण, कृणाल पांड्याचा हा संघ आपल्या 85 मिनिटांच्या खेळीत असे धमाके करेल की जग थक्क होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.

या फलंदाजांची नावं राहतील लक्षात : आपल्या फलंदाजीच्या जोरावर बडोद्यासाठी अशी अप्रतिम स्क्रिप्ट लिहिणाऱ्या फलंदाजांचं नाव आहे शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग, भानू पानिया, शिवालिक शर्मा आणि विष्णू सोलंकी. जर तुम्ही क्रिकेटला फॉलो करत नसाल तर याआधी यापैकी कोणत्याच बॅट्समनचं नाव तुम्ही ऐकलं नसेल. पण आता तुम्ही विसरणार नाही. अखेर त्यांच्या बळावरच बडोद्यानं तब्बल 263 धावांचा मोठा विजय नोंदवला.

'पांडव' ज्यांनी बडोद्यासाठी रचला इतिहास : बडोदा संघानं 20 षटकांत 349 धावा केल्या, ज्यात 5 फलंदाजांची भूमिका घेतली त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका होती. शाश्वत रावतनं 268 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 16 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानं 4 षटकार मारले. अभिमन्यू सिंगनं 17 चेंडूत 5 षटकारांसह 53 धावा केल्या. भानू पणियाची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. संघासाठी सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्यानं अवघ्या 51 चेंडूत 15 षटकारांसह नाबाद 134 धावा केल्या. शिवालिक शर्मा आणि विष्णू सोलंकी या दोघांनीही प्रत्येकी 6 षटकार ठोकले आणि झटपट अर्धशतकं झळकावली.

सर्वाधिक षटकार, सर्वाधिक धावांचा विक्रम : अशाप्रकारे बडोद्यानं T20 क्रिकेटमध्ये एक नाही तर दोन विश्वविक्रम मोडले. मोठी गोष्ट म्हणजे हे दोन्ही विश्वविक्रम अवघ्या 42 दिवसांपूर्वीच झाले होते. यापैकी पहिला सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम होता आणि दुसरा T20 च्या एका डावात सर्वाधिक षटकारांचा होता. हे दोन्ही विश्वविक्रम यापूर्वी झिम्बाब्वेच्या नावावर होते, जे 23 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या गॅम्बियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी केले होते. झिम्बाब्वेनं त्यांच्या डावात 27 षटकार मारुन 344 धावा केल्या होत्या. पण आता बडोद्यानं 85 मिनिटांच्या डावात 37 षटकारांसह 349 धावा करत झिम्बाब्वेला मागं सोडलं आहे.

हेही वाचा :

  1. 6,6,6,6,6...'शर्माजीच्या मुला'नं 28 चेंडूत ठोकलं वादळी शतक, केला महापराक्रम
  2. 37 षटकार, 349 धावा... बडोदा संघानं लिहिलं नवं 'रेकॉर्ड बुक'
  3. पाकिस्तान @250... जे 'साहेबां'च्या संघालाही जमलं नाही ते पाकिस्ताननं करुन दाखवलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.