ढाका BAN vs SA 2nd Test Live Streaming : बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 29 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघानं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Pictures from the training session as the players focus on the 2nd test match against South Africa at Zahur Ahmed Chowdhury Stadium, Chattogram.#BCB #Cricket #BANvSA #WTC25 #TestCricket pic.twitter.com/w1tXa44Wyr
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 28, 2024
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय : पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेसमोर 106 धावांचं लक्ष्य होतं, जे पाहुण्या संघानं 22 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी झॉर्झीनं दुसऱ्या डावात 52 चेंडूत सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं 30 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहे. या मालिकेत नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करमच्या हाती आहे.
Focused and Preparing 🎯 | Najmul Hossain Shanto | BAN vs SA | 2nd Test | Chattogram | #BANvsSA #WTC25 pic.twitter.com/huZhaZ4eKd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 28, 2024
बांगलादेश विजयाच्या प्रतिक्षेत : या मालिकेत बांगलादेशला आपल्या फिरकीपटूंच्या बळावर घरच्या मैदानावर मोठा विजय नोंदवायचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आपल्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आव्हान सादर करण्यास सज्ज आहे. अलीकडेच बांगलादेश संघाला भारताविरुद्धच्या मालिकेत 0-2 नं पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली संघ दुसऱ्या कसोटी विजयासाठी सज्ज झाला आहे. नजमुल हुसेन शांतो जबरदस्त फॉर्मात आहे. नजमुल हुसेन शांतोनं गेल्या 10 सामन्यांत 36 च्या सरासरीनं 682 धावा केल्या आहेत. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेला नियमित कर्णधार टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत खेळावं लागणार आहे. एडन मार्करम संघाची धुरा सांभाळणार आहे. एडन मार्करमनं गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. एडन मार्करमनं 6 सामन्यांत 46 च्या सरासरीनं 501 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका 2002 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 13 सामनं जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशच्या संघाला दक्षिण आफ्रिकेला एकदाही हरवता आलेलं नाही. दोन्ही संघांमध्ये बांगलादेशच्या भूमीवर 7 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं 5 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, 2 सामने अनिर्णित राहिले.
Victory for the Proteas! 🙌🏏
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 24, 2024
The boys have clinched the first Test against Bangladesh by 7 wickets, sealing the win with a dominant all-round performance! 💪
🇿🇦 A fantastic start to the series—onwards and upwards from here! 🏏🚀#WozaNawe #BePartOfIt #BANvsSA pic.twitter.com/zRQBye7min
खेळपट्टी कशी असेल : प्राप्त वृत्तानुसार, चट्टोग्राममधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळते. तथापि, पहिले एक ते दोन दिवस फलंदाजांसाठी चांगले मानले जातात आणि नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांनाही मदत करतात. जसजसा सामना पुढं जाईल तसतशी खेळपट्टी फलंदाजांसाठी काही अडचणी निर्माण करु शकते. पण खेळाच्या शेवटच्या दिवसांत खेळपट्टीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. जिथं फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नाणेफेक जिंकणारा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना मंगळवार, 29 ऑक्टोबरपासून भारतीय वेळेनुसार सकाळी 09:30 वाजता चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल.
One down, more to go! 🏏🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 27, 2024
Proteas stand-in Test captain, Aiden Markram, breaks down our first Test victory of the Bangladesh series.
Let’s finish strong, Mzansi! 💪🇿🇦#WozaNawe #BePartOfIt #BANvSA pic.twitter.com/lxEghvC06s
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केली जाणार नाही. तथापि, बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात थेट प्रसारित केली जाईल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघांचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
बांगलादेश : शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (यष्टिरक्षक), मेहदी हसन मिराज, जखार अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका : टोनी डी झॉर्झी, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रिट्झके, काइल वेरेन (यष्टिरक्षक), वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पिएड.
हेही वाचा :