ETV Bharat / sports

पाकिस्तान कंगाल... हॉकी संघाला चीनला जाण्यासाठी घ्यावं लागलं कर्ज - Pakistan Hockey Team

Pakistan Hockey Team Financial crisis : पाकिस्तान हॉकी संघ आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी संघाला उधार घेतलेल्या तिकिटांवर चीनला जावं लागलं.

Pakistan Hockey Team
पाकिस्तान हॉकी संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 30, 2024, 12:53 PM IST

नवी दिल्ली Pakistan Hockey Team Financial crisis : भारताचा शेजारी देश पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. महागाईमुळं जनतेचं जगणं कठीण झालं असून सरकार लाखो कोटींच्या कर्जात बुडालं आहे. आता पाकिस्तानच्या दुरवस्थेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. वृत्तानुसार, चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ कर्जावर विमान तिकीट घेऊन चीनला गेला आहे.

पाकिस्तान हॉकी संघाची आर्थिक स्थिती बिकट : पाकिस्तानच्या हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी चीनला जाण्यासाठी विमान तिकिटासाठी कर्ज घेतलं आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे (पीएचएफ) अध्यक्ष तारिक बुगती यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान संघाची आर्थिक स्थिती समोर आली तसंच हॉकीसाठी आर्थिक निधी सादर करण्याचं आवाहन केलं.

विमान तिकिटासाठी घ्याव लागलं कर्ज : फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड (PSB) नं लवकरच PHF च्या खर्चाच्या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. पीएसबीनं यापूर्वी पाकिस्तानच्या 18 वर्षाखालील बेसबॉल संघाला निधी देण्यास नकार दिल्यानंतर ही घटना घडली आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघाला निधी न दिल्याबद्दल बोर्डानं आर्थिक अडचणींचं कारण दिलं होतं.

संघ अडचणीत चीनला पोहोचला : बीजिंगहून त्यांचं उड्डाण रद्द झाल्यानंतर उधार घेतलेल्या तिकिटांवर उड्डाण करत पाकिस्तान हॉकी संघाला त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी रस्त्यानं 300 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. एकेकाळी जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पाकिस्ताननं अलिकडच्या वर्षांत आपल्या कामगिरीनं सर्वांची निराशा केली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 8 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा :

  1. 2 चेंडूत हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाजा ठरला सर्वात महागडा, हैदराबादनं आपल्या संघात केला समावेश - Most Expensive Player
  2. एक-दोन नव्हे तर 13 वेळा डोक्याला लागला चेंडू; 26 वर्षाय खेळाडूला घ्यायला लावली सक्तीची निवृत्ती? - Will Pucovski
  3. 'विराट एकच आहे...' शुभमन गीलवर टीका; वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेल्या व्हिडिओचं सत्य काय? - Virat Kohli deepfake video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.