ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार? अमित शाह यांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट - Amit Shah on Champions Trophy 2025 - AMIT SHAH ON CHAMPIONS TROPHY 2025

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत भारत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानं परिस्थिती स्पष्ट झाली आहे.

Champions Trophy 2025
गृहमंत्री अमित शाह भारतीय क्रिकेट संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 7, 2024, 1:03 PM IST

नवी दिल्ली Amit Shah on Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. याआधी भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. याबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. आता भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी यावर मोठं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणतेही संबंध शक्य नसल्याचं त्यांनी जवळपास स्पष्ट केलं आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याचं चित्र गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट : 'स्पोर्ट्स तक'शी बोलताना अमित शाह म्हणाले, 'जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चेच्या बाजूनं नाही.' अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जोपर्यंत पाकिस्तानातून दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचं अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे. यापूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाले होते राजीव शुक्ला : राजीव शुक्ला म्हणाले होते, 'चॅम्पियन ट्रॉफीच्या बाबतीत भारत सरकार जे काही करायला सांगेल ते आम्ही करु. भारत सरकारनं आम्हाला परवानगी दिली तेव्हाच आम्ही आमची टीम पाठवतो. त्यामुळं भारत सरकारच्या निर्णयानुसार आम्ही जाऊ, अशा परिस्थितीत बीसीसीआय सरकार जे म्हणेल ते करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन जवळपास हे स्पष्ट झालं आहे की, सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी देऊ शकत नाही.

जय शाहांचाही विरोध : बीसीसीआयचे सचिव आणि आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह, जे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे पुत्र आहेत. अनेक प्रसंगी ते भारताला पाकिस्तानात न पाठवण्याच्या बाजूनं दिसले आहेत. आशिया चषक स्पर्धेतही त्यांनी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवलं नाही. यानंतर ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी घेण्यात आली. आता ते आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत आणि 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारणार असल्यानं भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यापासून रोखण्याची ताकद त्यांच्याकडे असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कधी होणार : पाकिस्तान पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद भूषवणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल, ती 9 मार्च रोजी अंतिम सामन्यानं संपेल, जिथं आपल्याला नवा चॅम्पियन मिळेल. जर भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही तर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावी लागू शकते.

हेही वाचा :

  1. रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री... 'या' पक्षाचा झाला सदस्य, निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार? - Ravindra Jadeja in politics
  2. महाराष्ट्रातील दिग्गज क्रिकेटपटूसह 'या' दिग्गजांनी गाजवलं राजकारणाचं 'मैदान', एक तर झाला क्रीडामंत्री - Cricketers in Politics

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.