ETV Bharat / sports

शिखर धवननंतर 'हे' 11 खेळाडू करु शकतात क्रिकेटला 'रामराम'; अनेक IPL दिग्गजांचा समावेश - Team India Cricketers

Team India Cricketers : शिखर धवननंतर आता आणखी काही भारतीय क्रिकेटपटू आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. या खेळाडूंना बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे यातील काही खेळाडू 2011 च्या क्रिकेट विश्वचषकात सहभागी झालेल्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 25, 2024, 7:24 PM IST

नवी दिल्ली Team India Cricketers : भारताचा स्टार फलंदाज शिखर धवननं 24 ऑगस्ट (शनिवार) रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धवननं एका व्हिडिओ पोस्टद्वारे ही माहिती दिली. धवननं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट होतं. 38 वर्षीय धवन 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे.

आणखी खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता : धवनच्या निवृत्तीनंतर आगामी काळात आणखी काही भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. या खेळाडूंना बऱ्याच काळापासून संधी मिळाली नाही आणि भविष्यातही असं होण्याची शक्यता नाही. तरुण खेळाडूंकडे लक्ष दिल्यानं अशा खेळाडूंना राष्ट्रीय संघात पुनरागमन करणं फार कठीण आहे. या यादीत 2011 च्या क्रिकेट विश्वचषकात सहभागी झालेल्या विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश आहे.

Team India Cricketers
ऋद्धिमान साहा (Getty Images)

ऋद्धिमान साहा : महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खूप संधी मिळाल्या. मात्र, नंतर साहाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृध्दिमान साहानं शेवटचा सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळलेला वृद्धिमान साहा 39 वर्षांचा आहे. केएस भरत, इशान किशन, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांच्यामुळं साहाच्या संघात पुनरागमनाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत.

Team India Cricketers
इशांत शर्मा (Getty Images)

इशांत शर्मा : वेगवान गोलंदाज इशांत शर्मा एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. पण आता त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे. इशांत शर्मानं भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. इशांतनं कसोटीत 311, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 115 आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. त्यानं नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 35 वर्षीय इशांत शर्माचं पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे, कारण भारतीय संघ आता युवा वेगवान गोलंदाजांना संधी देत ​​आहे.

Team India Cricketers
मनीष पांडे (Getty Images)

मनीष पांडे : मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेची कथाही करुण नायरसारखीच आहे. 34 वर्षीय मनीष पांडेला मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेता आला नाही. पांडेनं भारतासाठी 29 कसोटी आणि 39 टी 20 सामने खेळले. या काळात त्यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 566 धावा आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 709 धावा केल्या. पांडेनं जुलै 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

Team India Cricketers
पियुष चावला (Getty Images)

पियुष चावला : 35 वर्षांचा पियुष चावला क्रिकेट विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघाचा सदस्य होता. पीयूष शेवटचा डिसेंबर 2012 मध्ये भारताकडून खेळताना दिसला नाही. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज पियुषनं भारतासाठी तीन कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर सात कसोटी, 32 एकदिवसीय आणि 4 टी 20 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. पियुषनं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) चं प्रतिनिधित्व केलं.

Team India Cricketers
अमित मिश्रा (Getty Images)

अमित मिश्रा : उजव्या हाताचा लेगब्रेक गोलंदाज अमित मिश्रा यानंही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. अमितनं शेवटचं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व 2017 मध्ये केलं होतं. जेव्हा तो इंग्लंडविरुद्धच्या टी 20 सामन्यात दिसला होता. 41 वर्षीय अमितनं भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 156 विकेट घेतल्या आहेत. अमित आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळला.

Team India Cricketers
भुवनेश्वर कुमार (Getty Images)

भुवनेश्वर कुमार : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भुवीनं शेवटचा नोव्हेंबर 2022 मध्ये भारताकडून खेळताना दिसला होता. 2013 मध्ये भारताकडून पदार्पण केल्यानंतर भुवनेश्वर सतत दुखापतींशी झुंज देत आहे. 34 वर्षीय भुवीनं केवळ 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 294 विकेट घेतल्या. भारतीय वेगवान गोलंदाजी संघात युवा गोलंदाजांच्या आगमनामुळं त्यांना आणखी संधी मिळण्याची शक्यता नाही.

Team India Cricketers
करुण नायर (Getty Images)

करुण नायर : वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त फक्त करुण नायरनं कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक झळकावलं आहे. मात्र, त्या त्रिशतकानंतर 31 वर्षीय करुण नायरचा आलेख वाढण्याऐवजी घसरतच राहिला. करुण नायर भारताकडून शेवटचा सामना 2017 मध्ये खेळला होता. करुण आता खूप कमी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळं त्याचं पुनरागमन होणं खूप कठीण आहे. करुणनं भारतासाठी सहा कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Team India Cricketers
ऋषी धवन (Getty Images)

ऋषी धवन : हिमाचल प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवननंही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ऋषीनं भारतासाठी तीन एकदिवसीय आणि एक टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं एकदिवसीय आणि टी 20 आंतरराष्ट्रीय दोन्हीमध्ये प्रत्येकी 1 बळी घेतला. 34 वर्षीय ऋषी भारताकडून जून 2016 मध्ये शेवटचा खेळला होता.

Team India Cricketers
मोहित शर्मा (Getty Images)

मोहित शर्मा : उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मानं आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी 26 एकदिवसीय आणि 8 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यात त्यानं वनडे फॉरमॅटमध्ये 31 विकेट घेतल्या. तर आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्यानं 6 खेळाडूंना आपला बळी बनवलं. 35 वर्षीय मोहितनं 2015 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता त्याला संधी मिळणं कठीण आहे. मोहित आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून (जीटी) खेळतो.

Team India Cricketers
उमेश यादव (Getty Images)

उमेश यादव : उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. उमेशनं भारताकडून शेवटचा सामना गेल्या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 36 वर्षीय उमेशनं भारतासाठी आतापर्यंत 57 कसोटी, 75 एकदिवसीय आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. उमेशनं कसोटी सामन्यात 30.95 च्या सरासरीनं 170 बळी घेतले आहेत. याशिवाय उमेशनं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 106 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.

जयंत यादव : उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज जयंत यादवलाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. जयंतनं भारतासाठी 6 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. जयंतनं 16 विकेट घेण्याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये 248 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्यानं 2 बळी घेतले. 34 वर्षीय जयंत भारताकडून मार्च 2022 मध्ये शेवटचा खेळला होता.

हेही वाचा :

  1. जो रुटचा मोठा पराक्रम, 62 धावा काढत 'द वॉल'ला टाकलं मागे, 'क्रिकेटच्या देवा'च्या मोठ्या विक्रमापासून फक्त चार पावलं दूर - Joe Root Record
  2. मोठी बातमी : भारताच्या 'गब्बर'चा क्रिकेटला अलविदा; भावनिक व्हिडिओ शेयर करत निवृत्ती जाहीर - Shikhar Dhawan Announces Retirement

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.