शारजाह AFG vs BAN 2nd ODI Live Streaming : अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेला 2-1 नं वनडे मालिका पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघ पुन्हा मैदानात उतरला आहे. हाच आत्मविश्वास त्यांनी कायम ठेवत 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशचा 92 धावांनी दारुण पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता हा सामना जिंकत अफगाणिस्तान पुन्हा एकदा इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल तर बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🙌
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AfghanAtalan have put on a remarkable bowling effort to beat Bangladesh by 92 runs in the 1st ODI and take an unassailable 1-0 lead in the series. 👏
Tremendous Result, Atalano! 🤩
#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/84qczboKL2
दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका : ही वनडे मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे ती आता फार दूर नाही. गेल्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तान संघानं बांगलादेशचा 92 धावांनी धुव्वा उडवला. वास्तविक त्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 35 धावा करुन संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत केवळ 235 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीनं सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवातही चांगली झाली नाही आणि अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.3 षटकांत केवळ 134 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानसाठी अल्लाह गझनफरनं सर्वाधिक सहा बळी घेतले.
𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒! 🎉
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AMG Shines and AfghanAtalan register a terrific victory in the 1st match of the ODI series against @BCBtigers!
Enjoy the winning moments here! 👏#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/TvpJQ6AafQ
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आतापर्यंत 17 वेळा वनडे सामन्यांमध्ये आमनेसाममने आले आहेत. ज्यात बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशनं 17 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननंही 7 सामने जिंकले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीचा सामना होतो.
खेळपट्टी कशी असेल : शारजाहच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणं घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र सीमारेषा लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देई शकतो.
𝐒𝐈𝐗 𝐚𝐧𝐝 𝐚 𝐏𝐨𝐓𝐌 𝐚𝐰𝐚𝐫𝐝 𝐟𝐨𝐫 𝐀𝐌𝐆! 🙌
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AM Ghazanfar delivered a phenomenal bowling performance for #AfghanAtalan and claimed his career-best figures of 6/26 to earn the Player of the Match award. 🤩
Outstanding bowling, Ghaz! 👏#GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/udGRCI1vK7
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 नोव्हेंबर (अफगाणिस्तान 92 धावांनी विजयी)
- दुसरा वनडे सामना : आज
- तिसरा वनडे सामना : 11 नोव्हेंबर
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 9 नोव्हेंबर (शनिवार) रोजी शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 03:00 वाजता होईल.
.@AzmatOmarzay is pumped up as he takes his 1st in the game, courtesy of an excellent catch by @FazalFarooqi10 in the deep. 💪⚡#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/d6xmRNtCh5
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कसं पहावं?
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे सामना प्रसारित करण्याचे अधिकार भारतात फॅनकोडला आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका टीव्हीवर प्रसारित करण्यासाठी उपलब्ध नाही.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
बांगलादेशचा संघ : सौम्या सरकार, तनजीद हसन, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, तौहीद हृदोय, जॅक अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा.
अफगाणिस्तानचा संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), फरीद अहमद, इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), नूर अहमद, सेदीकुल्ला अटल, फजलहक फारुकी, अल्लाह मोहम्मद गझनफर, रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), रियाझ हसन, रशीद खान, नांगियालाई खरोती, अब्दुल मलिक, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरझाई, दरविश रसौली, बिलाल सामी, नवीन झदरन.
हेही वाचा :