ETV Bharat / sports

'कांगारुं'कडून अफगाणिस्तानचा तीन वेळा अपमान; आता टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत घेतला बदला - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 5:01 PM IST

AFG vs AUS T20I : टी 20 विश्वचषकाच्या सुपर-8 मध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्ताननं आपल्या तीन वेळा झालेल्या अपमानाचा बदलाही घेतला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय आहे.

AFG vs AUS T20I
अफगाणिस्तान (Social Media)

हैदराबाद AFG vs AUS T20I : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन फक्त इतिहासच रचला नाही. तर त्यांनी आपल्या अपमानाचा बदलाही घेतला आहे. वास्तविक द्विपक्षीय मालिकेसाठी अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला वारंवार विनंती करत होता. पण, जेव्हा-जेव्हा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं हा प्रस्ताव पुढं केला, तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तो पुढं ढकलला. अफगाणिस्तान क्रिकेटबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तीचं कारण नेहमीच एकच होते, ते म्हणजे तालिबान.

तालिबानचं कारण देत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार : आतापर्यंत तालिबान आणि खेळावरील बंदी असं कारण देत ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्यास एकदा नव्हे तर तिनवेळा नकार दिला होता. अशा परिस्थितीत द्विपक्षीय मालिकेचा मुद्दा सोडून, ​​जेव्हा दोन्ही संघ आयसीसीच्या तटस्थ व्यासपीठावर आमनेसामने आले, तेव्हा अफगाणिस्तानच्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा बदला म्हणूनही पाहिलं जातंय. या विजयासह अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ते इतके कमजोर नाही की त्यांच्यासोबत मालिका खेळू शकत नाही.

ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानशी तीन वेळा खेळण्यास दिला नकार : अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका किंवा सामना खेळण्याचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 30 वेळा नाकारला आहे. पहिल्यांदा 2021 मध्ये ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानसोबत होबार्टमध्ये होणारा एकमेव कसोटी सामना रद्द करुन याची सुरुवात केली. यानंतर, मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियानं UAE मध्ये अफगाणिस्तानसोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ऑगस्ट 2024 मध्ये होणारी अफगाणिस्तानसोबतची टी 20 मालिकाही पुढं ढकलली आहे.

टी 20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं घेतला 'बदला' : जरी ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळली नाही. पण, आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना अफगाणिस्ताविरुद्ध खेळावं लागलं आणि टी 20 विश्वचषकात आज जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा अफगाणिस्ताननं दाखवून दिलं की त्यांना पराभूत करणं सोपं नाही. त्यांच्यासोबतची मालिका हलक्यात घ्यावी, एवढा तो कमकुवत संघ नाही. अफगाणिस्ताननं आपल्या विजयासह ऑस्ट्रेलियाला हा धडा शिकविण्याचा प्रयत्न केला असेल, आता ऑस्ट्रेलियाच्या संघावर त्याचा कितपत परिणाम होतो हे पाहायचं आहे. अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याच्या निर्णयावर ते फेरविचार करतील का? याचीही चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु आहे.

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तानचा टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक विजय, 21 धावांनी ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव - T20 World Cup 2024
  2. पॅट कमिन्सचा धडाका! टी-20 विश्वचषकात सलग दुसरी हॅट्रिक करणारा ठरला पहिला खेळाडू - T20 World Cup 2024
  3. भारतानं 50 धावांनी विजय मिळवित बांगलादेशचा उडवला धुव्वा, 'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार - T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.