हरारे ZIM Beat AFG After 5 Years : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथं तो यजमान संघासोबत 2 कसोटी, तीन वनडे आणि तीन T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 11 डिसेंबर रोजी तीन सामन्यांच्या T20 मालिकेनं झाली ज्यात अफगाणिस्तान संघाला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 4 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली ज्यात 20 षटकांत 145 धावा करण्यात यश आलं, तर झिम्बाब्वे संघानं शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Zimbabwe win a last-ball thriller to take a 1-0 lead in the series ⚡#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3pB5B pic.twitter.com/DyCYkTNKPb
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
झिम्बाब्वेनं पाच वर्षांनंतर केला अफगाणिस्तानचा पराभव : अष्टपैलू फलंदाज ब्रायन बेनेटनं मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वे संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यानं 49 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीनं 49 धावा केल्या. या शानदार खेळीसाठी बेनेटला सामनावीराचा किताबही देण्यात आला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात झिम्बाब्वे संघाला विजयासाठी 11 धावांची गरज होती, त्यानंतर पहिल्या तीन चेंडूत 8 धावा आल्यानं सामना पूर्णपणे यजमान संघाच्या ताब्यात गेला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर एकही धाव न मिळाल्यानं अफगाणिस्ताननं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाचव्या चेंडूवर 2 धावा आणि नंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत झिम्बाब्वे संघानं सामना पूर्णपणे जिंकला. झिम्बाब्वे संघाला तब्बल 5 वर्षांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्यात यश आलं आहे. झिम्बाब्वेनं यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये अफगाणिस्तानचा T20 सामन्यात पराभव केला होता.
PLAYER OF THE MATCH 👏
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
Brian Bennett
49 (49) & 0/12 (1)#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3p3g3 pic.twitter.com/XnZOxUaog8
नवीननं एका षटकात टाकले 13 चेंडू : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकसाठी हा सामना एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. नवीन उल हक हा अफगाणिस्तानचा T20 फॉरमॅटमधील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे, पण हा दिवस त्याचा नव्हता. वास्तविक, झिम्बाब्वेच्या डावात नवीन उल हकनं 15 वं षटक टाकलं, या षटकात त्याला 6 कायदेशीर चेंडू टाकण्यासाठी 13 चेंडू टाकावे लागले. यात नवीन उल हकनं 6 वाईड बॉल आणि 1 नो बॉल टाकला, ज्यामुळं त्यानं या षटकात एकूण 19 धावा खर्च केल्या.
Zimbabwe clinch last-ball thriller against Afghanistan
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 12, 2024
Details 🔽https://t.co/DekrMC7snj pic.twitter.com/VqKcTqKGdu
अफगाणिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांची खराब कामगिरी : या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खाननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यास अजिबात उशीर केला नाही, त्यानंतर करीम जनातची 54 धावांची खेळी आणि मोहम्मद नबीच्या 44 धावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजानं खेळपट्टीवर जास्त वेळ घालवला नाही. यानंतर नवीन उल हकनं गोलंदाजीत नक्कीच तीन विकेट घेतल्या पण तोही महागडा ठरला. आता उभय संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 13 डिसेंबर रोजी हरारेच्याच मैदानावर होणार आहे.
RESULT | ZIMBABWE WON BY 4 WICKETS 🚨
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 11, 2024
Naveen Ul Haq (3/33) and the skipper Rashid Khan (2/26) put on a strong bowling effort, but it wasn't meant to be as the hosts, Zimbabwe, took the first T20I home by 4 wickets. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/ZEwxfMCAnP
हेही वाचा :