राजकोट Fastest Century in T20 For India : भारतीय क्रिकेट संघातून पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माला आपला हरवलेला फॉर्म परत मिळाल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची बॅट फारशी खेळली नसली तरी आता तो पुन्हा आपल्या शैलीत स्फोटक फलंदाजी करत आहे. अभिषेक शर्मानं धमाकेदार शतक झळकावलं आहे. यासह भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा विक्रम काही दिवसांत दुसऱ्यांदा मोडला आहे. मात्र, सुदैवाची गोष्ट म्हणजे उर्विल पटेल थोडक्यात बचावला. एक चेंडू कमी असता तर उर्वीलही मागं राहिला असता.
HUNDRED BY ABHISHEK SHARMA IN SMAT...!!! 🌟
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 5, 2024
- A century in just 28 balls with 7 fours and 11 sixes. A blistering knock by the Punjab captain while chasing 143. 🤯🔥 pic.twitter.com/PBmc2qggvw
अभिषेक शर्मानं मेघालयविरुद्ध झळकावलं 28 चेंडूत शतक : अभिषेक शर्मा सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळत आहे. मेघालयविरुद्ध खेळताना अभिषेक शर्मानं केवळ 28 चेंडूत शतक झळकावलं. काही दिवसांपूर्वीच गुजरातकडून खेळताना उर्विल पटेलनं 28 चेंडूत शतक झळकावून ऋषभ पंतचा विक्रम मोडला होता. ऋषभ पंतनं 32 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला होता, आता हा विक्रम काही दिवसांत दोनदा मोडला गेला आहे. अभिषेक शर्मा आणि उर्विल पटेल बरोबरीवर आले आहेत. या दोघांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 28 चेंडूतच शतकं झळकावली आहेत.
🚨 ABHISHEK SHARMA - JOINT FASTEST HUNDRED BY AN INDIAN IN T20 HISTORY 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) December 5, 2024
- Abhishek smashed Hundred from just 28 balls in Syed Mushtaq Ali while chasing 143 runs. 🤯 pic.twitter.com/K6PbcWPh4V
अभिषेकनं उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं केली फलंदाजी : दरम्यान, स्ट्राईक रेटवर नजर टाकली तर अभिषेक शर्मा या बाबतीत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्यानं आपलं शतक पूर्ण केलं तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट 365.52 होता. T20 मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या साहिल चौहाननं या वर्षी सायप्रसविरुद्ध शतक झळकावले तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट 351.21 होता. जेव्हा उर्विल पटेलनं त्रिपुराविरुद्ध स्फोटक शतक केलं तेव्हा त्याचा स्ट्राइक रेट 322.85 होता. म्हणजेच स्ट्राईक रेटच्या दृष्टीनं पाहिलं तर तो सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज आहे, पण असे रेकॉर्ड फारसे मोजले जात नाहीत. शतक पूर्ण करताना फलंदाजानं किती चेंडूंचा सामना केला हे पाहिलं जातं.
FASTEST T20 HUNDRED BY INDIAN PLAYERS:
— Johns. (@CricCrazyJohns) December 5, 2024
Abhishek Sharma - 28 balls.
Urvil Patel - 28 balls.
Rishabh Pant - 32 balls.
Rohit Sharma - 35 balls.
Urvil Patel - 36 balls. pic.twitter.com/PzHwsch7fV
पंजाबनं दहाव्या षटकातच जिंकला सामना : अभिषेक शर्मानं सामन्यादरम्यान एकूण 29 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. या खेळीत त्यानं 11 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत. सामन्याच्या शेवटी त्याचा स्ट्राईक रेट 365 पेक्षा जास्त होता. प्रथम फलंदाजी करताना मेघालय संघानं 20 षटकांत 7 गडी गमावून 142 धावा केल्या. अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकामुळं पंजाबनं या धावसंख्येचा पाठलाग केवळ 9.3 षटकांत केला. अभिषेकशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आलं नाही.
हेही वाचा :