लखनऊ Abhimanyu Easwaran Century : इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईचा फलंदाज सर्फराज खानच्या द्विशतकानंतर आता 'रेस्ट ऑफ इंडिया'चा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरननं अप्रतिम फलंदाजी केली आहे. ईश्वरननं मुंबईविरुद्ध अवघ्या 117 चेंडूत शतक झळकावलं, या खेळाडूनं एक षटकार आणि 8 चौकार लगावले. 'रेस्ट ऑफ इंडिया'ची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रुतुराज गायकवाड केवळ 9 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. साई सुदर्शनलाही केवळ 32 धावा करता आल्या आणि पडिक्कलनं 16 धावा केल्या पण ईश्वरननं एक बाजूनं संयमी खेळी करत आपलं शतक पूर्ण केलं.
Abhimanyu Easwaran brings up his 💯🙌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
An excellent innings so far, laced with eight 4⃣s and one6⃣ 👌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/ReqAGVaX0l
ईश्वरनला अद्याप भारतीय संघात संधी नाही : अभिमन्यू ईश्वरननंही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. परंतु या खेळाडूला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. ईश्वरनला निश्चितपणे कसोटी संघात अनेकवेळा स्थान मिळालं पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये पोहोचू शकला नाही. बरं, ईश्वरन यामुळं निराश नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करुन हा खेळाडू सातत्यानं निवडीचे दार ठोठावत आहे. ईश्वरननं इराणी ट्रॉफीमध्ये शतक झळकावताना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 वं शतक पूर्ण केलं. त्यानं या सामन्यात 212 चेंडूत नाबाद 151 धावा केल्या आहेत.
1⃣5⃣0⃣ up for Abhimanyu Easwaran 🙌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
Brilliant knock so far from the Rest of India opener 👌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/4y2IIaVqHU
इश्वरननं केली शतकांची हॅट्ट्रिक : अभिमन्यू ईश्वरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूनं सलग तीन शतकं झळकावली आहेत. ईश्वरननं दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावलं होतं. ईश्वरननं इराणी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावलं आहे. इश्वरनच्या शतकांची हॅट्ट्रिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या निवडीचा मार्ग खुला करु शकते.
सरफराजनंही ठोकलं द्विशतक : याआधी सर्फराज खाननं इराणी ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवून दिली होती. मुंबईच्या या फलंदाजानं 'रेस्ट ऑफ इंडिया'विरुद्ध पहिल्या डावात 222 धावांची नाबाद खेळी खेळली. सरफराजनं 286 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 25 चौकार मारले. सर्फराजच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं इराणी ट्रॉफीच्या पहिल्या डावात 537 धावा केल्या. सरफराजशिवाय अजिंक्य रहाणेनंही 97 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरनं 57 आणि तनुष कोटियननं 64 धावा केल्या.
हेही वाचा :