दुबई Vaibhav Suryavanshi : बिहारचा 13 वर्षीय खेळाडू, वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापासून चर्चेत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला राजस्थान रॉयल्सनं लिलावात 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतलं. आयपीएलसाठी निवड झालेला वैभव हा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो सध्या UAE मध्ये पुरुष अंडर-19 आशिया कप 2024 खेळत आहे. या सामन्यातील पहिल्याच सामन्यात त्यानं एक खास विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, फलंदाज म्हणून त्याला या सामन्यात विशेष काही करता आलं नाही.
THE VAIBHAV SURYAVANSHI INTERVIEW. pic.twitter.com/7U7iLjprcM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 30, 2024
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विशेष रेकॉर्ड : वैभव सूर्यवंशीला दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अंडर-19 क्रिकेटमधला हा त्याचा पहिला वनडे सामना होता, याआधी तो भारताकडून कसोटी खेळला होता. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यासाठी मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीनं इतिहास रचला. वास्तविक, वैभव सूर्यवंशी आता भारताकडून अंडर-19 वनडे खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या 13 वर्षे 248 दिवसात त्यानं हा सामना खेळला. यापूर्वी हा विक्रम पियुष चावलाच्या नावावर होता. पियुष चावलानं वयाच्या 14 वर्षे आणि 311 दिवसांत भारतीय अंडर-19 संघासाठी वनडे सामना खेळला.
फलंदाजीत ठरला अपयशी : मात्र, हा पदार्पणाचा सामना वैभव सूर्यवंशीसाठी काही खास नव्हता. या सामन्यात वैभव सलामीवीर म्हणून खेळला, पण त्याला 9 चेंडूत केवळ 1 धाव करता आली आणि त्यानं त्याची विकेट गमावली. चेंडू बाहेर जाताच वैभवनं त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं तो यष्टिरक्षकाकडे झेलबाद झाला. म्हणजेच पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी त्याच्या चाहत्यांच्या आणि आयपीएल संघाच्या अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही.
INDIAs YOUNGEST U-19 ODIs PLAYERS :
— Akshay Tadvi 🇮🇳 (@AkshayTadvi28) November 30, 2024
- Vaibhav Suryavanshi : 13y 248d (2024 )
- Piyush Chawla : 14y 311d ( 2003)
- Kumar Kushagra : 15y 30d (2019)
- Shahbaz Nadeem : 15y 180d (2005)
- Virbhadrasinh Gohil : 15y 216d (1985)#IndvPakOnSonyLIV pic.twitter.com/vsaQMmnEFe
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत झळकावलं होतं शतक : वैभव सूर्यवंशीनं गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली होती. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 64 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या होत्या. या काळात त्यानं अवघ्या 58 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. या स्फोटक खेळीत त्यानं 14 चौकार आणि 4 षटकार मारले. यासह तो अंडर-19 कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला होता. याच वर्षी, वैभव सूर्यवंशीनं बिहार क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-19 वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावलं होतं. अंडर-19 स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिलंच त्रिशतक ठरलं होतं.
हेही वाचा :