ETV Bharat / spiritual

वर्षातील पहिली सोमवती अमावस्या, जाणून घ्या आजच्या अमावस्येचं धार्मिक महत्त्व - Somwati Amavasya 2024 - SOMWATI AMAVASYA 2024

Somwati Amavasya 2024 चैत्र महिन्यातील आज सोमवती अमावस्या आहे. या अमावस्येचे धार्मिक महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या.

Somwati Amavasya
Somwati Amavasya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 8:30 AM IST

हैदराबाद Somwati Amavasya 2024 - ज्योतिष आचार्य पंडित सुशील शुक्ला शास्त्री यांच्या माहितीनुसार शिव पुजेचे सोमवती अमावस्येला खास महत्त्व आहे. या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. पितृांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्या महत्त्वाची मानली जाते.

शास्त्राच्या माहितीनुसार सोमवती अमावस्येला महिला व्रत करतात. शिव आणि पार्वतीची पूजा करतात. सोमवती अमावस्येला पूजा आणि व्रत करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते. सोमवती अमावस्येला संपूर्ण दिवस व्रत करणाऱ्या महिलांना अखंड सौभाग्य मिळते. पितृांचा आशिर्वाद मिळतो. ज्योतिष आचार्य पंडित सुशील शुक्ला शास्त्री म्हणाले, जर शिवलिंगाला दूध आणि गंगाजलाचा अभिषेक केला तर पितृ दोष, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. पितृांच्या आत्म्याला शांती मिळते.

कधी आहे मुहूर्त?सोमवती अमावस्येला पूजा करण्यासाठी सकाळी सुर्योदयापूर्वी उठा. ब्राम्हमुहूर्तावर स्नान करा. सुर्याला अर्घ्य देऊन पूजा करा. व्रत करण्याचा संकल्प घेऊन शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा करा. पिंपळाला १०८ प्रदक्षिणा घाला. सायंकाळी पिंपळाच्या खाली दिवा प्रज्वलित करा. त्यामुळे शंकर-पार्वती आणि शनि देव प्रसन्न होतात. पंडित रमेश शर्मा यांच्या माहितीनुसार आजची सोमवती अमावस्या चालू वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आहे. ही अमावस्या ८ एप्रिलला पहाटे तीन वाजून ११ मिनिटाला सुरू होते. तर रात्री ११ वाजून ५० मिनिटाला संपते. दान करण्यासाठी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटे ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्ताला करण्यात आलेले दान आणि स्नान याचे चांगले फळ मिळते.

का केली जाते पूजा?सोमवती अमावस्येला पितृांच्या आत्म्याला शांती करण्यासाठी पूजा केली जाते. ज्या व्यक्तींवर पितृांची अवकृपा आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. पितृांची पूजा केल्यानंतर काळे तीळ दान केले जाते. सोमवती अमावस्येला कोणत्याही प्राणी आणि पक्ष्याला त्रास देऊ नये. कुत्रा, कावळा आणि गायीला चपाती खायला देतात. तसेच त्यांची पाण्याची व्यवस्था केली जाते. तांदळाची खीर करून शंकर-पार्वतीला प्रसाद देतात. माशांना अन्न दिल्याने सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते.

अमावस्येबरोबर आज आहे सूर्यग्रहण- चैत्र महिन्यातील सोमवती अमावस्या हा दिवस दान करण्यासाठी आणि प्राण्यांना चारा देण्यासोबत पितृांची पूजा करण्यासाठी सर्वात चांगला दिवस आहे. सोमवती अमावस्येला कोणतेही शुभकार्य किंवा कोणत्याही नवीन कामाला सुरुवात केली जात नाही. राहुकाल आज 07:59 ते 09:33 पर्यंत राहणार आहे. चैत्र अमावस्येबरोबर आज सूर्यग्रहणही आहे. मात्र, हे पूर्ण सूर्यग्रहण देशात दिसणार नाही.

( Disclaimer- ही माहिती धार्मिक श्रद्धेनुसार आहे. यामध्ये दिलेल्या माहितीबाबत अथवा अंधश्रद्धेबाबत ईटीव्ही भारत कोणतेही समर्थन करत नाही.)

हेही वाचा-

  1. 'या' चार राशीसाठी असणार सूर्यग्रहण लाभदायक, वाचा सविस्तर - total solar eclipse 2024
  2. 8 एप्रिल 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.