हैदराबाद Nag Panchami 2024 : नागपंचमी हा सण (Nag Panchami) श्रावण शुक्ल पक्षाच्या (Shravan 2024) पाचव्या दिवशी साजरा केला जातो. देवतांमध्ये सापांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात. यावर्षी शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी 'नागपंचमी' साजरी होत आहे. परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नागपंचमीच्या दिवशी करू नयेत ते पाहूयात.
नागपंचमीच्या दिवशी काय करावं : नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु केतू भारी आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी. नागदेवतेला दूध, मिठाई आणि फुलं अर्पण करावीत. लक्षात ठेवा की, नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचं भांडं वापरावं. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत.
नागपंचमीच्या दिवशी काय करू नये : नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका. शेतात नांगरणी, जमीन खोदणं अशी कामं करू नका. याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानलं जाते. तसेच वृक्षतोड करू नका. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर, गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये.
भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा : भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात. त्याचे नाव अनेक देवी-देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे. इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. नाग हा रानात, शेतात राहणारा प्राणी आहे. पावसाळ्यात त्याच्या बिळ पाण्यानं भरते म्हणून तो गावात, घरात येतो. घरात तो अतिथी म्हणून येतो. त्यामुळं त्याचं पूजन करावं. नागाला शेतात राहायला आवडते. त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करतो. उंदीर, घुस इ. शेतात येऊ देत नाही. हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर एक उपकारच आहे.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या लेखातील कोणत्याही माहितीचं 'ईटीव्ही भारत' समर्थन करत नाही. )
हेही वाचा -
आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024