पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi 2024) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आज (12 नोव्हेंबर) श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर तसंच मानाचे वारकरी यांच्या हस्ते पार पडली. विठ्ठल-रुक्मिणीच्या या महापूजेत यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर मानाचे वारकरी ठरले.
सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी : शासकीय महापूजेदरम्यान उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून भाविकांची निवड करण्यात आली. मानाचे वारकरी ठरलेले सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दोन मुलं, दोन मुली आणि नातवंडं असं त्यांचं कुटुंब असून गेल्या 14 वर्षांपासून ते नियमितपणे वारी करत आहेत. दरम्यान, मानाचा वारकरी निवड करण्याची प्रक्रिया व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, राजाराम ढगे यांनी पार पाडली.
कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा नेहमी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. परंतु, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडली. शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समिती मार्फत होणारी श्री विठ्ठल-रुक्मिणीची पाद्यपुजा आणि नित्यपुजा अनुक्रमे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न झाली.
- पंढरपुरात भाविकांची मांदियाळी : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळं प्रशासनाच्यावतीनं ठिक-ठिकाणी भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
- पंढरपूरमध्ये 12 दिवसात 9 लाख भाविकांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन; आतापर्यंतची सर्वाधिक दर्शनाची नोंद - Vitthal Darshan In Pandharpur
- अलंकापुरीत विसावला संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, पहा व्हिडिओ - Dnyaneshwar Maharaj Palkhi
- 'या' दोन जिल्ह्यातील प्रति पंढरपूर मंदिरात आषाढी एकादशी साजरी; विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - Ashadhi Ekadashi 2024