- मेष : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळं खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणं योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळं द्विधा अवस्थेत अडकाल.आज कोणाला जामीन राहू नये.
- वृषभ : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार-व्यवसायात वाढ होईल. रम्यस्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख आणि संपर्क यांमुळं लाभ होईल. संतती आणि पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
- मिथुन : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्यानं मनास प्रसन्न वाटेल. मान-सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळं आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल.
- कर्क : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंधदृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकारकडून ही फायदा संभवतो.
- सिंह : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावं लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
- कन्या : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश आणि कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार-व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे इत्यादींची खरेदी केल्यानं खुश व्हाल. मित्रांसह प्रवासाचा आनंद लुटाल.
- तूळ : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. कामात सफलता आणि यश प्राप्त होईल.
- वृश्चिक : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपण वाद-विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्यानं त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स आणि सट्टा यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे यथोचित यश सुद्धा मिळेल.
- धनू : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. धनहानी व मानहानी संभवते. मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. छातीचे दुखणे त्रास देऊ शकते.
- मकर : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र-परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता.
- कुंभ : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज द्विधा मनःस्थिती असल्यानं निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्यानं कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.
- मीन : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचं वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. एखाद्या प्रवासात किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल.
हेही वाचा -