- मेष : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपलं मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळं कोणाचं बोलण्यामुळं मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळं आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
- वृषभ : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्यानं आपण स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला आणि साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडं चांगलं लक्ष राहील. मित्रांसह प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचं भोजन मिळेल. नशिबाची साथ लाभेल.
- मिथुन : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील.
- कर्क : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास शारीरिक आणि मानसिक सौख्य मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात जाईल. आपलं मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
- सिंह : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळं कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडं लक्ष द्या. वाणी आणि व्यवहार यात संयम आणि विवेक राखावा.
- कन्या : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात आणि नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्यानं पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.
- तूळ : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल.
- वृश्चिक : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आळस, थकवा आणि चिंता यामुळं कामाचा उत्साह मंद जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणं आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका.
- धनू : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळं आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावं. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणानं वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्यापासून दूर राहा.
- मकर : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र आणि संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ आणि मान - सन्मान यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आणि एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल.
- कुंभ : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक आणि मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात उत्साहाचं वातावरण राहील.
- मीन : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.
हेही वाचा -
Today Panchang : 19 मार्च 2024 पंचांग ; काय आहे आजचा शुभमुहूर्त, योग आणि राहूकाळ
18 March Horoscope: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ