ETV Bharat / spiritual

आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशी भविष्य - Horoscope 19 June 2024 - HOROSCOPE 19 JUNE 2024

Horoscope 19 June 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 19 June 2024
राशी भविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 5:51 AM IST

  • मेष (ARIES) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावं लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणं हितावह राहील. संतीविषयक काळजी निर्माण होईल. दुपारनंतर घरातील वातावरण शांत असल्यानं मानसिकदृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज काही ना काही कारणानं आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणं हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.
  • सिंह (LEO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्यानं नवीन कामाची सुरूवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्यानं शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपारनंतर वातावरण एकदम पालटेल. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ शकाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील. नशिबाची साथ मिळेल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपारनंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडं लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. शारीरिक आणि मानसिक स्वस्थता जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनासाठी पैसा खर्च कराल.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान-सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं वाणी संयमित ठेवा.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपारनंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.
  • मीन (PISCES) : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूलता लाभेल. बौद्धिक दृष्टया लेखन कार्यात सहभागी व्हाल. परदेशस्य स्नेह्यांकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. व्यवसायात सावध राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.

हेही वाचा -

'या' पाच राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.