ETV Bharat / spiritual

'या' राशींचं नशीब चमकणार, होणार धनलाभ; वाचा राशी भविष्य - Today Horoscope - TODAY HOROSCOPE

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 5:43 AM IST

  • मेष : चंद्र आज कर्क राशीत आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपून टाकवं लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक आणि मानसिकदृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळं आरोग्यावर ताण येईल. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्यानं आनंदित व्हाल, मात्र त्यात वाद निर्माण होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी लागेल. प्रवासात त्रास संभवतो.
  • वृषभ : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्यानं आनंदाचं प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया ताजेतवानं राहाल. आर्थिक लाभ संभवतात. परंतु दुपारनंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. खर्च वाढेल आणि कामात यशप्राप्ती होणे कठीण होऊन बसेल.
  • मिथुन : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचं धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या सहवासामुळं मन आनंदीत होईल. प्रवास आनंददायी होतील.
  • कर्क : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील आणि मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळं मन भ्रष्ट होऊ नये याकडं लक्ष द्यावं लागेल. पैसा जास्त खर्च होईल.
  • सिंह : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणं आज टाळावं. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज आणि मतभेद होण्याची शक्यता असल्यानं वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. दुपारनंतर मात्र मित्र- स्नेही यांच्या भेटीमुळं मन प्रसन्न होईल.
  • कन्या : चंद्र आज कर्क राशीत आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक आणि मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळं कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोर्ट-कचेरीच्या व्यवहारात सावध राहावं लागेल. धनहानी आणि मानहानी होण्याची शक्यता आहे.
  • तूळ : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळं व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. तब्बेत उत्तम राहील. मानसिक शांतता लाभेल. संततीकडून सुख मिळेल.
  • वृश्चिक : आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. मातेशी सौहार्दता राहील. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होतील. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.
  • धनू : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपारनंतर मात्र, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. व्यवसायात लाभ होईल. मित्र आणि स्नेही यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. प्रवास संभवतात.
  • मकर : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अवैध कार्यापासून दूर राहावं.
  • कुंभ : चंद्र आज कर्क राशीत आहे. आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र आणि अलंकार यासाठी पैसा खर्च होईल. एखादा प्रवास घडेल.
  • मीन : चंद्र आज कर्क राशीत आहे. आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणं हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभल्यानं समाधान होईल. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

हेही वाचा -

  1. चैत्र नवरात्री 2024 : जाणून घ्या चैत्र नवरात्रीचं महत्व आणि कलश पूजेचा शूभ काळ - Chaitra Navratri 2024
  2. 'या' पाच राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.