- मेष : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळं काही बाबींत त्रास होईल. नोकरी-व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं.
- वृषभ : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळं संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे.
- मिथुन : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तांचा सहवास यांमुळं दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.
- कर्क : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता आणि द्विधा मनस्थितीमुळं निर्णय घ्यायला अतिशय कठिण जाईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद ह्यापासून शक्यतो दूर राहावं.
- सिंह : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल.
- कन्या : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान-सन्मान वाढेल. सरकारकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील. वसुली किंवा व्यावसायिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल.
- तूळ : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. प्रकृती यथा तथाच राहील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील.
- वृश्चिक : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. उक्ती व कृतीवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणं - पिणं सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. चिंतन-मनन यात वेळ घालवाल. त्यामुळं मानसिक शांती मिळण्याबरोबरच व्याधी दूर राहतील.
- धनू : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल.
- मकर : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यापार-व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्यानं आर्थिक देवाण-घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृ घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहावे.
- कुंभ : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील, म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावा.
- मीन : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथा स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद-विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळं आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने पाण्यापासून दूर राहावं. स्थावर संपत्ती, वाहन इत्यादींच्या समस्या निर्माण होऊन आपली चिंता वाढेल.
हेही वाचा -
नोकरी, कौटुंबिक जीवनासह संपत्ती मिळविण्यात यश मिळेल का? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope