ETV Bharat / spiritual

लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा; 'अशी' करा गणपतीची पूजा - Ganesh Chaturthi 2024 Puja Vidhi

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम सगळीकडं आहे. आपल्या लाडक्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना यथासांग करावी असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र, कधीकधी मनासारखे गुरुजी मिळत नाहीत. त्यामुळं गणपतीची पूजा कशी करायची असा प्रश्न पडतो. त्यामुळं पूजाविधी तुमचा तुम्हीच कसा करू शकता, याबाबत या लेखात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

Ganesh Chaturthi 2024
गणपती (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 10:41 PM IST

Updated : Sep 6, 2024, 10:57 PM IST

हैदराबाद Ganeshotsav 2024 : शनिवारी (7 सप्टेंबर) दिवसभर गणेश चतुर्थी आहे. त्यामुळं सूर्योदयापासून तुमच्या सवडीनुसार दिवसभर कधीही गणेशपूजा करता येईल. पूजेसाठी आधी सर्व तयारी करुन घ्यावी. त्यासाठी पाणी वस्त्र, कापसाचे वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत तयार करुन घ्यावं. गंध उगाळून घ्यावा. जी शक्य असतील ती फुले घ्यावीत.

पूजा करण्यासाठी स्टेप्स पुढीलप्रमाणे :

सर्व साहित्य घेतल्यानंतर स्नान केलेल्या व्यक्तीनं पूजेसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करुन पाटावर बसावं. सुरुवातीला कपाळाला गंध लावावा. सर्वसाधारणपणे गणपतीच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेला होणार नाही अशी काळजी घेऊन गणपती बसवण्याची जागा निवडावी. अशा यथाशक्ती सजवलेल्या जागी गणपतीची मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी. त्यावर आधी नवीन वस्त्र ठेवावे. शक्यतो हे वस्त्र लाल रंगाचे असावे. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवून मूर्ती ठेवावी.

मूर्ती वस्त्रावर ठेवल्यानंतर पूजा विधिला सुरुवात करावी. यामध्ये सुरुवातीला समई किंवा निरंजन लावून घ्यावे. त्यानंतर नमस्कार करावा. पूजा विधीसाठी घेतलेल्या सर्वच साहित्यावर दूर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडून ते पवित्र करुन घ्यावे. तसंच स्वतःच्या डोक्यावरही पाणी शिंपडून स्वतःला पवित्र करुन घ्यावे.

सगळी पूजा सामग्री पवित्र करुन घेतल्यावर पळीमध्ये पंचपात्रातील पाणी घेऊन संकल्प सोडावा. सर्वांना सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, शांतता लाभो अशी प्रार्थना यावेळी करावी. त्यानंतर नमस्कार करुन गणपतीचे ध्यान करावे. त्यानंतर गणपतीचे आवाहन करुन प्रतिष्ठापना करावी.

गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर दूर्वांच्या सहाय्यानं पाणी शिंपडून गणेशाचा अभिषेक करावा. सुरुवातीला पंचामृत आणि नंतर पाण्याचा अभिषेक करावा. 'पंचामृत स्नानं समर्पयामी' तसंच 'शुद्धोदक स्नानं समर्पयामी' असा मंत्र यावेळी म्हणावा. गणपतीची मूर्ती मातीची असल्यानं मूर्तीला बाधा येणार नाही याची काळजी घेऊनच हलकेच दूर्वांच्या सहाय्यानं पाणी शिंपडून अभिषेक करावा.

पंचामृताचा अभिषेकही अशाच पद्धतीनं करावा. पंचामृत करताना त्यामध्ये केळ घालू नये. पंचामृत करताना त्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप यांचा वापर करावा.

अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. जर ते म्हणता येत नसेल तर अथर्वशीर्षाची धून लावावी. वातावरण प्रसन्न होते. ही पूजा झाल्यानंतर गंधफूल अक्षता, दूर्वा वाहावी. त्यानंतर गणपतीला कापसाचे वस्त्र घालावे.

यथासांग पूजा झाल्यावर गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती करावी. गणपतीपुढे पुरेशी जागा असल्यास साष्ठांग नमस्कार करावा. अशा पद्धतीनं पूजा करुन गणपती उत्सवाला प्रारंभ करावा.

टीप - वरील मजकूर प्राप्त माहितीनुसार

हेही वाचा -

  1. कोल्हापुरातील दोन मित्रांची कमाल, कार्यशाळेतून घडवले गणपती कलाकार - Ganeshotsav 2024
  2. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात! 'राजा'चा पहिला लूक आला समोर; मुकुट ठरतोय चर्चेचा विषय - Ganesh Chaturthi 2024
  3. 'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; नवसाला पावणाऱ्या गणपतीचं विसर्जन करतात संकष्टीला - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 6, 2024, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.