हैदराबाद Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात फार महत्वाचा आणि पवित्र सण समजला जातो. वैशाख महिन्याच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. अक्षय्य या शब्दाचा अर्थच ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, असा होतो. अक्षय्य तृतीया या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जाते. याविषयी अक्षय्य तृतीया हा सण 10 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. ईटीव्ही भारतनं याबाबत प्रसिद्ध तज्ज्ञ भारत ज्ञान भूषण यांच्याशी अक्षय तृतीयाबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या अक्षय्य तृतीयाचं महत्त्व विषद केलं. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हेही सांगितलं.
अक्षय्य तृतीया हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त : सगळ्यात मोठा शुभकाळ हा आगामी येणारा अक्षय्य तृतीयेचा सण आहे. या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जाते. त्याचं फळ अक्षय असते, त्याचे परिणाम कोणत्याही जन्मात आत्म्याला साथ देतात, असं सुप्रसिद्ध कर्मोलॉजिस्ट भारत ज्ञान भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं. अक्षय्य तृतीया या सणाला कोणतंही काम, वाहन खरेदी, भूमिपूजन, कोणतंही नवीन कार्य, नवा पवित्र धागा धारण करणे, कोणतीही नवीन दीक्षा घेणं, या सगळ्यांसाठी शुभच ठरते. यावेळी अक्षय्य तृतीयेमध्ये चार योग आहेत. याला चतुर्माघी तिथी असं म्हणतात. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्यामुळे या तिथीला योगतिथी म्हणतात. या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली. त्यामुळे अक्षय्य तृतीया या सणासारखी मोठी कोणतीच तिथी नाही, असंही सुप्रसिद्ध कर्मोलॉजिस्ट भारत ज्ञान भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अक्षय्य तृतीयाला यावर्षी क्रांती दिन : 10 मे हा देखील क्रांती दिन आहे. या दिवशी, मेरठमधून क्रांतीचा बिगुल वाजला होता. त्यामुळे मेरठमध्ये क्रांती दिनाचं अन्यन साधारण महत्व आहे. यावेळी अक्षय्य तृतीय या सणाला क्रांती दिन येत आहे. यावेळी अक्षय्य तृतीयाला सूर्य आणि चंद्र अधिक प्रभावी राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी काहीही दान करू नये. सूर्याचं दान म्हणजे गहू आणि बाजरी असते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र दान करू नये, असंही सुप्रसिद्ध कर्मोलॉजिस्ट भारत ज्ञान भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अक्षय्य तृतीयेला कोणत्या गोष्टी टाळाव्यात : या अक्षय्य तृतीया या सणाला सूर्य आणि चंद्राला काही अशुभ दान करू नका. राहू आणि बुध यांच्याशी संबंधित दान करणं गरजेचं आहे. विशेषत: सत्तूचं दान करा, त्यासोबत भिजवलेला हरभरा दान करू शकता. छत्री, चप्पल, मोजे, शरबत दान करता येईल, मात्र फिकट पाणी दान करू नये. अक्षय्य तृतीयेला आपण दान वगैरे केले तर त्याचं फळ आपल्याला या जन्मात नक्कीच मिळते. पण, मोक्ष स्थिती प्राप्त होईल, हे गुण सदैव तुमच्यासोबत राहतील, असं सुप्रसिद्ध कर्मोलॉजिस्ट भारत ज्ञान भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं. या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी मातीच्या भांड्यात 11 आंब्याची पानं ठेवून मनोकामना सांगावी. सत्तूचं दान करण्यासोबतच त्याचं सेवन स्वतः करावं. ओल्या हरभऱ्याची फांदी भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करावी. अशा रितीनं हा प्रसाद आपल्या जीवनात अमृतमय होईल. आपल्या जीवनातून नकारात्मक प्रभाव नाहीसे होतील.
कोणता आहे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी 7.14 ते 10.36 पर्यंत विशेष लाभदायक योग आहे. अभिजीत मुहूर्त 11:50 ते 12:44 पर्यंत आहे. 12:17 ते 1:58 दरम्यान शुभ योग आहे. जप, दान, तपश्चर्या, खरेदी, आदी या काळात अत्यंत शुभ राहील. यासोबतच अशुभ काळही लक्षात असू द्या. तो 10:45 ते 12:23 पर्यंत चालेल. यामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं टाळलं तर बरं होईल, असंही भारत ज्ञान भूषण यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- महाराणा प्रताप जयंतीच्या दोन तारखा का आहेत, जाणून घ्या मेवाडच्या शूर योद्ध्याबाबतची रंजक कहाणी - Maharana Pratap Jayanti 2024
- जागतिक रेडक्रॉस दिवस का आहे इतका महत्वाचा, घ्या जाणून - WORLD RED CROSS DAY 2024
- घरातील एसीसह कुलरमुळे जीवाला होऊ शकतो धोका, सुरक्षेसाठी चुकूनही 'या' टिप्सकडं करू नका दुर्लक्ष - summer 2024 heatwaves