ETV Bharat / politics

"राज्यातील शाळासुद्धा अदानींकडं"; विरोधक म्हणाले, "महाराष्ट्राचा सातबारा..." - Vijay Wadettiwar - VIJAY WADETTIWAR

Vijay Wadettiwar : राज्यातील विविध प्रकल्प हे अदानींच्या कंपनीकडं आहेत. आता आणखी एक शासन निर्णय जारी करण्यात आलाय. यावरुन विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. वाचा काय आहे निर्णय...

Vijay Wadettiwar On State Government
विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे, गौतम अदानी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 10:35 PM IST

मुंबई Vijay Wadettiwar : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाने हाती घेतल्यानं विरोधकांकडून विरोध केला जातोय. देशातील विविध पायाभूत सुविधा आणि व्यवसायात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अदानी समुहाला शाळा व्यवस्थापन सोपवण्याबाबत राज्य सरकारनं शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. त्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर टीका केली. शिंदे सरकारनं महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावावर करण्याचा निर्धार केल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर (Mahayuti) निशाणा साधला.

विरोधक आक्रमक : राज्यात महायुती सरकार (Mahayuti) आल्यापासून अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. राज्यातील धारावी या मोठ्या प्रकल्पाचं काम उद्योगपती गौतम अदानी यांना दिलंय. आता राज्यातील शाळा व्यवस्थापनाचं कामही अदानींनाच देण्यात आलंय. "आता राज्यातील सातबारा अदानींच्या नावे महायुती सरकारला करायचा आहे का?" असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट करत हा संतप्त सवाल राज्य सरकारला विचारला.

प्रतिक्रिया देताना विजय वडे्टीवार (ETV Bharat Reporter)

काय म्हटलंय पोस्टमध्ये? : "महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच धोका अदानींचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवरपण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवला आहे का? शाळेच्या भिंतीवर आदरानं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे." अशी पोस्ट 'एक्स'वरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

शाळांबाबत शासन निर्णय : दरम्यान, कार्मेल एज्युकेशन सोसायटी, घुग्घुस, जि. चंद्रपूर ही शाळा 'अदानी फाउंडेशन' अहमदाबाद या संस्थेस व्यवस्थापनासाठी हस्तांतर करण्यात आली. याला अटी आणि शर्तीवर मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचा निर्णय हा देखील विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडला असून, त्या शासन निर्णयात कोणत्या अटी आणि शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत याची माहिती दिली.

राज्यातील शाळा अदानींना देण्याचा निर्णय : एकीकडं राज्यातील प्रकल्प अदानींच्या घशात घालत असतात, आता राज्यातील शाळासुद्धा सरकारनं सोडल्या नाहीत. चंद्रपुरातील शाळा अहमदाबाद येथील अदानींना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. याबाबत राज्य शासनानं शासन निर्णय घेतला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि वाईट आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हेही वाचा -

  1. अदानीला मुंबई आंदण देण्याची भाजपाची 'लाडका मित्र योजना' - खासदार गायकवाड - Land in Mumbai to Adani
  2. हिंडेनबर्ग अहवालावरुन काँग्रेसकडून पुन्हा संसदीय चौकशीची मागणी, कट रचला जात असल्याचा भाजपाचा आरोप - Hindenburg Research Report
  3. "उद्धव ठाकरेंनी अदानींकडून चंदा घेतला की नाही? हिम्मत असेल तर...." - Dharavi Redevelopment Project

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.