ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय तिसऱ्यांदा लढविणार निवडणूक, वाराणसी मतदारसंघात काय आहेत समीकरणे? - varanashi lok sabha elections - VARANASHI LOK SABHA ELECTIONS

varanashi lok sabha elections काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी शनिवारी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण ४६ उमेदवारांसह उत्तर प्रदेशमधील ९ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय हे वाराणसीमधून निवडणूक लढविणार आहेत.

varanashi lok sabha elections 2024
varanashi lok sabha elections 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 10:40 AM IST

लखनौ varanashi lok sabha elections - उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं समाजवादी पक्षाबरोबर युती केली आहे. जागावाटपानुसार काँग्रेस उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी १७ जागांवर निवडणूक लढविणार आहेत. त्यामध्ये वाराणसी या मतदारसंंघाचादेखील समावेश आहे.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असल्यानं संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडं लागलेलं आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघ हा काशी आणि बनारस या नावानंसुद्धा ओळखला जातो. काँग्रेसनं उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना तिसऱ्यांदा वाराणसीमधून लोकसभेच तिकीट दिले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना दोन्ही वेळा पराजय स्वीकारावा लागला होता.

काँग्रेसला विजयाची आशा-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकलेले आहेत. १९९१ पासून भाजपाकडं वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा ताबा आहे. केवळ २००४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेश मिश्रा यांना वाराणसीमधून विजय मिळाला होता. समाजवादी पक्षाबरोबर युती केल्यानं वाराणसी मतदारसंघात पक्षाला फायदा होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

वाराणशी मतदारसंघात काय आहेत जातीय समीकरणे? काँग्रेस नेत्याच्या माहितीनुसार वाराणसीमधील जातीय समीकरणे वेगळी आहेत. वाराणसीमध्ये कुर्मी समाजाच्या मतदारांची अधिक संख्या आहे. विशेषत: रोहनिया आणि सेवापुरी विधानसभा मतदारसंघात कुर्मी मतदारांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर वाराणसीमध्ये ब्राम्हण आणि भूमिहार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाराणसी लोकसभा निवडणुकीत वैश्य, यादव आणि मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. वाराणसी मतदारसंघात बिगर यादव मतदारांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. मतदारसंघात दोन लाखांहून अधिक कुर्मी, दोन लाख वैश्य आणि दीड लाख भूमिहार मतदार आहेत. दुसरीकडं वाराणसीमध्ये एक लाख यादव आणि एक लाख अनुसूचित जातीचे मतदार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काँग्रेसला मोठे आव्हान निर्माण करता येईल, असा विश्वास आहे. देशात सर्वप्रथम १९५२ मध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस, सीपीएम आणि लोकदलानंही वाराणसीमधून विजय मिळविला आहे.

वाराणसी मतदारसंघ भाजपासाठी कशाामुळे महत्त्वाचा?पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी हे एकाच जागेवरून निवडणूक लढवित तीन वेळा पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर एकाच जागेवरून निवडणूक लढविणारे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत. नरेंद्र मोदी हे भाजपामधील सर्वात महत्त्वाचे उमेदवार असल्यानं त्यांच्यासाठी वाराणसी हा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ आहे. त्यामुळे मोदी हे गुजरातमधील मतदारसंघापेक्षा वाराणसी या मतदारसंघाला प्राधान्य देतात. त्यामुळे ते तिसऱ्यांदा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मागील वाराणसी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांचा 4 लाख 79 हजार 505 मतांनी पराभव केला होता.

हेही वाचा-

  1. PM Narendra Modi: येत्या पाच वर्षात भारताची सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती दिसेल-पंतप्रधान मोदी
  2. काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा; गडकरींविरोधात विद्यमान आमदाराला तिकीट - Lok Sabha Elections 2024
  3. काँग्रेसचा अंतर्गत वाद शिगेला; विजय वडेट्टीवारांच्या विरोधातील 'त्या' व्हायरल पत्राबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप - Vijay Wadettiwar viral letter

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.