ETV Bharat / politics

मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे; देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, पोलीस म्हणाले... - Devendra Fadnavis Office Attack - DEVENDRA FADNAVIS OFFICE ATTACK

Devendra Fadnavis Office Attack : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर एका महिलेनं तोडफोड केली. मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेला छेद देत महिलेनं केलेल्या तोडफोडीमुळं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Devendra Fadnavis Office Attack
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 3:00 PM IST

Updated : Sep 27, 2024, 3:53 PM IST

मुंबई Devendra Fadnavis Office Attack : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं तोडफोड केल्याची माहिती समोर आलीय. मंत्रालयातील या घटनमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. मंत्रालयामध्ये येणाऱ्यांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातो. मात्र, मंत्रालयाची हीच सुरक्षा व्यवस्था आता चव्हाट्यावर आली आहे.

महिलेचा शोध सुरू : गुरुवारी संध्याकाळी एक अज्ञात महिला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचली आणि तिनं गृहमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील मातीच्या कुंड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी या महिलेला कोणीही थांबवताना दिसलं नाही. दरम्यान, महिला फरार असून पोलिसांनी शोध सुरू केलाय. सदर महिलेचं नाव आणि तिनं असं कृत्य का केलं, याबाबतचं कारण पोलिसांनी सांगितलं नाही.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड (Source - ETV Bharat Reporter)

पोलीस उपायुक्त म्हणतात, मला माहित नाही : महिलानं मंत्रालयात प्रवेश कसा केला? असा प्रश्न सुनील कांबळे यांना विचारला असता, मला याबाबत काहीही माहिती नाही, असं सांगितलं. मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, असं पोलिस उपायुक्त सांगत असतील तर मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा कोणाच्या भरवशावर आहे? असा प्रश्न निर्माण झालाय.

गृहमंत्री सुरक्षित नाहीत? : या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी, "या घटनेमुळं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राज्याचे गृहमंत्री असलेल्या व्यक्तीला स्वतःची सुरक्षा करता येत नाही. राज्याचं गृहमंत्रालय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जर सुरक्षित नसतील, तर राज्यातल्या जनतेच्या सुरक्षेबाबत काय अपेक्षा करणार?" असा टोला लगावलाय.

हेही वाचा

  1. काँग्रेसला मुंबई अन् विदर्भात हव्यात सर्वाधिक जागा; राज्यातील सत्ता स्थापनेसाठी विदर्भ ठरणार निर्णायक - Congress demands 45 seats Vidarbha
  2. प्रकाश आंबेडकर यांचा तिसऱ्या आघाडीत समावेश का झाला नाही? जाणून घ्या, राजकीय कारणे - Tisari Aghadi
  3. "एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता"- बच्चू कडूंचं निवडणुकीपूर्वी मोठं वक्तव्य - Bachchu Kadu

Last Updated : Sep 27, 2024, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.