ETV Bharat / politics

घराणेशाहीवरुन अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "इंडिया आघाडीतील...." - अमित शाह महाराष्ट्र दौरा

Amit Shah Visit Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरांना भेटी देत ते तिथल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतायेत. अमित शाह यांची अकोल्यात एक बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी महत्त्वाचा कानमंत्र दिलाय. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे 'इंडिया' आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देतात," असे अमित शाह यांनी घराणेशाहीवरुन पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

Amit Shah
अमित शाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 5:39 PM IST

Updated : Mar 5, 2024, 6:18 PM IST

अकोला Amit Shah Visit Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागं विविध घडामोडी घडत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह यांनी अकोल्यात एक बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, "कार्यकर्ता भाजपाची संपत्ती असून, कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळं आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. आपण पक्ष विस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाईक म्हणून कार्यरत आहोत. या देशातील बूथ प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता होऊ शकतो. हे केवळ भारतीय जनता पक्ष करू शकते."

लोकसभा पूर्वतयारीची बैठक : अमित शाह हे अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपा संचालन समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक आणि लोकसभा पूर्वतयारीच्या बैठकीत बोलत होते. हॉटेल ग्रँड जलसा येथे त्यांचं आगमन झालं होतं. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर विराजमान होते.

भाजपा निवडणूक जिंकणारच : "भाजपा सकारात्मक पद्धतीनं निवडणूक लढणार आहे. जनतेच्या मनातला लोकनेता, जनतेला अभिप्रेत नेता प्राप्त झालाय. प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळं भाजपाचा हा विजयाचा मंत्र आणि आधार आहे. भाजपा 2024 ची निवडणूक जिंकणारच आहे. परंतु, 25 वर्षांचे लक्ष घेऊन भाजपाच्या चार पिढीनं केलेला संघर्ष, तपस्या, बलिदान याला नमन करून पक्ष विस्तारासाठी विपरीत परिस्थिती काम केलं. पक्षानं दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडा. लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम करा," असं शाह म्हणाले.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार : "काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केलं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन समाजकारण, राजकारण आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं कार्यक्रम सुरू आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी असा कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांना न्याय येण्याचं काम केलंय. लोकांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आहे. त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कल्पकतेनं जनतेशी संवाद साधा. भाजपा आणि महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा आपणच आहे, या विचारानं कामाला लागा," असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं वंदन : अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा गढ आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा येथे मोठा प्रभाव आहे. या प्रभावाला प्रभावित करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी शिवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करून त्यांना वंदन केलं. त्यांच्या या कृतीमुळं येथील आंबेडकरवादी चळवळीला त्यांनी प्रभावित करून भाजपा हा सर्वच समाजाचा आदर करणारा आणि विश्वास ठेवणारा पक्ष आहे, असं दाखवून दिलं.

हेही वाचा -

  1. " निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींचा 'खरा चेहरा'..." इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड करण्यातील दिरंगाईवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
  2. "लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही, पण..."; सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
  3. तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही याची खात्री द्या; प्रकाश आंबेडकरांचं आव्हाड यांना प्रत्युत्तर

Last Updated : Mar 5, 2024, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.