ETV Bharat / politics

Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला - Uddhav Thackrey News

Uddhav Thackrey News : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना महाविकास आघाडीत येण्याची दुसऱ्यांदा ऑफर दिली. ते यवतमाळमधील सभेत मंगळवारी बोलत होते. त्यावरून भाजपाच्या लोकसभेच्या पहिल्या यादीत नाव न आलेल्या नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Uddhav Thackrey: "गडकरीजी त्यांच्यासमोर का झुकता, त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय दाखवा", उद्धव ठाकरेंची गडकरींना पुन्हा ऑफर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 9:46 AM IST

यवतमाळ Uddhav Thackrey Invites Nitin Gadkari : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते हे सातत्यानं गट सोडत असताना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याचं आवाहन केलं. "आपला अपमान होत असेल तर भाजपा सोडा," असं म्हणत त्यांनी गडकरी यांना ऑफर दिलीय. दोन दिवसांपूर्वी ठाकरे यांनी गडकरींना अशीच ऑफर दिली होती. त्यावर गडकरींनी अपरिपक्व विधान म्हणत ठाकरेंनी काळजी करण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.

ठाकरेंचा गडकरींना पुन्हा ऑफर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, "काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या यादीतून गडकरींचं नाव गायब होते. मी दोन दिवसांपूर्वी गडकरींना सांगितलं होतं आणि पुन्हा सांगत आहे. तुमचा अपमान होत असेल तर तुम्ही भाजपा सोडून महाविकास आघाडीत या. महाविकास आघाडी तुमचा विजय निश्चित करेल याची मला खात्री आहे. तसंच आमचं सरकार सत्तेत आल्यास महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी तुमच्याकडं सोपवू. देशात आमचं सरकार येणार आहे. गडकरीजी का झुकता त्यांच्यासमोर, दाखवा त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना पुनश्च आपल्या पक्षात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलंय.

उद्धव ठाकरेंचं विधान अपरिपक्क्व : उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेलं निमंत्रण गडकरी यांनी हास्यास्पद असल्याचं सांगत फेटाळून लावलंय. तसंच त्यांनी ठाकरे यांचं वक्तव्य अपरिपक्व असल्याचं म्हटलंय. "भाजपा कोणाला उमेदवारी देतो, याची काळजी करण्याची गरज नाही. भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी यंत्रणा तयार केली आहे. त्यानुसार काम केलं जातं," असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

हेही वाचा :

  1. "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.