ETV Bharat / politics

ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI - UDDHAV THACKERAY ON ECI

Uddhav Thackeray : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आलीय. ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून 'जय भवानी' शब्द काढा, असं या नोटीसमधून सांगण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलंय. याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि मोदी-शाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 4:05 PM IST

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे

मुंबई Uddhav Thackeray : देशासह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. आता महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात रंगत वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडत आहेत.

ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात : शिवसेना ठाकरे गटाकडून गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'प्रचार गीत' प्रदर्शित करण्यात आलं होतं. प्रचार गीतातील दोन शब्दांवर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला होता. प्रचार गीतातील दोन शब्द काढून टाकण्याबाबत ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलंय.

मोदी, शाह यांच्यावर कारवाई करावी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतानं जोश निर्माण होतोय. गीतात 'जय भवानी' आणि 'जय शिवाजी' घोषणा आहेत. निवडणूक आयोगानं 'जय भवानी' शब्द काढण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र, आम्ही हा शब्द काढणार नाही, असं स्पष्ट उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. "आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्याआधी मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान होत असल्याचा आरोप आम्ही केला तर तुमच्याकडं याचं उत्तर आहे का?," असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

उद्या 'जय शिवाजी' देखील काढायला लावणार : "आम्ही देवाच्या नावावर मतं मागितली नाहीत. भवानी मातेचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. 'जय भवानी, जय शिवाजी' आम्ही म्हणत असतो. महाराष्ट्रातील कुलदैवतांबाबत इतका आकस असेल हे माहिती नव्हतं. आज तुम्ही 'जय भवानी' शब्द काढायला लावता, उद्या 'जय शिवाजी' शब्द देखील काढायला लावणार का? आम्ही या विरोधात लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत 'जय भवानी' शब्द काढला जाणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.

निवडणूक आयोगाला पाठवलं स्मरणपत्र : काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 'प्रचार गीत' प्रसिद्ध करण्यात आलं होतं. प्रचार गीतातील दोन शब्दावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं शब्द काढण्याबाबतची नोटीस बजावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ठाकरे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाना राज्यात निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेस आम्ही निवडणूक आयोगाला एक स्मरणपत्र पाठवलं होतं. त्यात आम्ही विचारलं होतं की, निवडणूक आयोगाच्या नियमावलीत काही बदल करण्यात आला आहे का?." पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ माध्यमांना दाखवला.

देवाच्या नावावर मतं मागणं आचारसंहितेत बसतं का? : "रामाचं दर्शन करायचं ना, खर्च होणार आहे. मात्र, मी म्हणतो खर्च होणार नाही, तुम्ही तीन डिसेंबरला मध्य प्रदेश राज्यात भाजपाचं सरकार बनवा आम्ही तुम्हाला दर्शन घडवू. हा आवाज आता जनतेपर्यंत पोहोचला असेलच. त्याचवेळी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राच्या माध्यमातून विचारणा केली होती. कारण की, बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा काढल्यानं त्यांचा निवडणूक आयोगानं सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. करप्ट प्रॅक्टिसच्या अंतर्गत ही कारवाई केली होती. मात्र, मोदी-शाह उघड उघड देवाच्या नावानं मत मागत आहे. हे आचारसंहितेत बसतं का? अशा पद्धतीची विचारणा आम्ही पत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला केली होती. आम्ही त्या पत्रात असंही लिहिलं होतं की, आम्हाला उत्तर द्या, अन्यथा उत्तर आलं नाही तर नियमात बदल झाल्याचं गृहीत धरू, आम्हीसुद्धा अशाप्रकारे प्रचार करू आमच्यावर कारवाई करू नये असंही निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान पदावरुन संजय राऊत नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणाले 'उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार' - Sanjay Raut Slams Nana Patole
  2. उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदी, अमित शाहांनाही घेतलं फैलावर - Lok Sabha Election 2024
  3. "उद्धव ठाकरेंना वेड लागलंय"; ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर - Devendra Fadnavis Reply

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.