मुंबई Uddhav Thackeray : जळगाव लोकसभा मतदारसंघावर (Jalgaon Lok Sabha Constituency) भाजपाचा वरचष्मा आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) भाजपाचे उमेदवार ए टी पाटील हे निवडून येत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, अमळनेर विधानसभा मतदारसंघ, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं जाण्याची दाट शक्यता आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघ (Raver Lok Sabha Constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर (Matoshree) बोलावली होती.
पक्षाच्यावतीनं तयारी सुरू : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आलीय. या संदर्भात आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा सहप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. हर्षल माने, गुलाबराव वाघ, कुलभूषण पाटील यांच्यासह आणखी दोन उमेदवार इच्छुक आहेत. आम्ही सर्वांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलीय.
जळगाव जिंकून आणणारच : या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने पाटील म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला जोरदार तयारी करण्याचे आदेश मिळाले आहेत. आता हा लोकसभा मतदारसंघ जिंकून आणण्याची जबाबदारी आमची आणि तसे वचन आम्ही शिवसेना कार्यप्रमुखांना दिलं आहे. त्यामुळं आता उमेदवार कोण आहे हे आम्ही पाहणार नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जिंकून आणणारच असा दावा पाटील यांनी यावेळी केलाय.
हेही वाचा -