ETV Bharat / politics

"लाडक्या बहिणीला आवडती-नावडती बहीण करायला लागले", उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला घेरलं - UDDHAV THACKERAY ON MAHAYUTI

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज (17 डिसेंबर) नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 5:37 PM IST

Updated : Dec 17, 2024, 10:58 PM IST

नागपूर : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज (17 डिसेंबर) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवर आंदोलन केलं. तर सभागृहात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरूनही गदारोळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आज त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्र्यांच्या वजाबाकीची चर्चा जास्त : महायुतीचं सरकार ईव्हीएमच्या विजयानं आलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. राक्षसी बहुमत मिळालं आहे, पण विजयाचा आनंद कुठेच दिसत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालाय, परंतु विस्तारापेक्षा मंत्र्यांच्या वजाबाकीची चर्चा जास्त आहे. तसंच ज्यांनी शाश्वत धर्मामुळं आम्ही कोणाला सोबत घेणार नाही असं म्हटलं होतं. ते आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

पत्रकारपरिषदेत बोलताना उध्दव ठाकरे (Source - ETV Bharat Reporter)

लाडकी बहीण योजनेवरुन हल्लाबोल : पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी 'लाडकी बहीण योजने'वरुन महायुती सरकारवर निशाणा साधला."सरकारनं निवडणुकीपूर्वी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेतून आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला होता. असे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेत. त्यावेळी कोणतेही निकष किंवा नियम पाहिले गेले नाहीत. मात्र, आता या योजनेत निकष लावले जाणार असल्याचं बोललं जात आहे. लाडक्या बहिणीला आता आवडती-नावडती बहीण करायला लागलेत. ज्या महिलांना पूर्वी या योजनेला लाभ दिला होता, त्या सरसरट महिलांना योजनेचा लाभ द्यावा," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "सरकारनं निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनामात अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणा त्यांनी पाळाव्यात. आम्ही सोयाबीनला हमीभाव देऊ, असं म्हटलं होतं, परंतु आमचं सरकार आलं नाही. आता या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करावं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत 1400 झाडांची कत्तल? : "राज्यपालांचं अभिभाषण झालं, तेव्हा मी नव्हतो. परंतु आज त्याची प्रत मी वाचली. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात हे माझं राज्य असा उल्लेख केला आहे. पर्यावरणासाठी त्यांनी आता एक समिती गठीत केली आहे. त्या समितीत कोण कोण असणार? त्यांनी कुठला अभ्यास केलाय? आणि ते आता काय अहवाल देणार? हे कळलं पाहिजे. आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही मेट्रो कारशेड येथील कामाला स्थगिती दिली होती. पण या सरकारनं मुंबईत मेट्रोसाठी गोरेगावमधील अनेक झाडांची कत्तल केली आहे. मुंबईतील डोंगरी येथील 1400 झाडांची देखील कत्तल केला जाणार आहे, अशी बातमीही आत्ता समोर आली आहे. जर झाडांची एवढी कत्तल होणार, असेल तर पर्यावरण समिती काय कामाची? ते काय अभ्यास करणार? या झाडांची एवढी कत्तल होणार, हे त्यांना दिसणार की नाही?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा : "बीडमधील एका माजी सरपंचाची हत्या झाली आहे. आता याच्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. हत्या झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी सभागृहात जर चर्चा होत असेल, तर आरोपीवर शिक्षा व्हायला किती दिवस लागतील हे समजत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पण मंत्र्यांना अधिकच धाकधूक आहे. आमचे अनिल परब आणि संजय पोतनीस हे क्रिकेटचा फिरता चषक सामन्याची स्पर्धा भरवतात, तसं आता हे मंत्रिमंडळ फिरता चषक होणार आहे. कारण त्यांना अडीच-अडीच वर्षाचं आश्वासन दिलं आहे. जसं मंत्र्यांचा फिरता चषक अडीच वर्ष होणार, तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं पण होणार का? हे समजलं पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारची दैना, वहां नही रहेना : दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि मागील सरकारमधील मंत्र्यांना डावलण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांनीही याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "जहां नही चैना, वहां नही रहना," असं भुजबळांनी म्हटलंय. सरकारची दैना झालीय, त्यामुळं भुजबळांना वहां नही रहना, असं वाटत असावं. छगन भुजबळांबाबत फार वाईट वाटतं. असं अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. एका अपेक्षेनं तिकडे गेले होते. अशा सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. छगन भुजबळांनी अजूनतरी संपर्क आपल्याशी केला नाही. परंतु ते अधूनमधून आपल्या संपर्कात असतात, बोलत असतात." असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाची पण परीक्षा झाली पाहिजे : "राज्यात महायुतीच्या विरोधात एवढं वातावरण असताना देखील त्यांना एवढं राक्षसी बहुमत कसं मिळालं समजत नाही. हा विजय इव्हीएमचा विजय आहे. ईव्हीएम विरोधात राज्यभर आंदोलनं, मोर्चे सुरू आहेत. मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी करत आंदोलन केलं. तेथील लोकांचा आदर करून निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगात पारदर्शकता असली पाहिजे. कारण आपण जे मतदान करतोय, ते मतदान कुठं गेलं? कोणाला गेलं? हे लोकशाहीत जर समजलं नाही, तर वन नेशन, वन इलेक्शनचा फायदा काय? निवडणूक आयोगाचा कारभारही पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळं निवडणूक आयोगाची पण परीक्षा झाली पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

... त्यांची सवय जुनीच : एकीकडे मंत्रिमंडळ आणि शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. नॉट रिचेबल होण्याची त्यांची जुनी सवय असल्याचं उद्ध ठाकरे म्हणाले.

Uddhav thackeray meet Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट (Source - ETV Bharat)

उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट : उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, अनिल परब, भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.

हेही वाचा

  1. महायुतीमध्ये मंत्रिपदाचं कसं बसं निभावलं, पण खाते वाटपाचं काय?
  2. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाकरिता मतदान सुरू
  3. 'आता किती आदळआपट केली, तरी हाती खुळखुळाच' ; संजय राऊतांचा नाराज छगन भुजबळ, मुनगंटीवारांवर हल्लाबोल

Last Updated : Dec 17, 2024, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.