ETV Bharat / politics

Uddhav Thackeray : यांची तर औरंगजेबी वृत्ती...; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघात - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बुलडाण्यात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीका केलीय.

Uddhav Thackeray On Narendra Modi And Amit Shah
उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी आणि अमित शाहवर टिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 10:23 PM IST

सभेत बोलताना उद्धव ठाकरे

बुलडाणा Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळं जवळ जवळ सर्वच पक्षांनी आपआपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार आणि सभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे देखील कामाला लागले असून, ते स्वत: मैदानात उतरून जनसंवाद दौऱ्याचा झंझावात करत आहेत. त्या अनुषंगानं आज उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात (Buldana News) जनसंवाद सभा पार पडली.

भाषणातून घेतला भाजपाचा समाचार : सिंदखेडराजा येथे बुधवारी रणरणत्या उन्हात उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जिजामातेच्या माहेरातून त्यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यावेळेस त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचा आपल्या भाषणातून समाचार घेतला. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या खतावरच्या मोदींच्या फोटोकडं आपला मोर्चा वळवला. ज्या खताच्या पोत्यामध्ये शेणखत आहे, त्यावर देखील मोदींचा फोटो आहे. आमचं सरकार आल्यानंतर हा मोदींचा फोटो काढून टाकू असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवंत, जिजा राठोड उपस्थित होते.

यांची औरंगजेबी वृत्ती : पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, काही जण असे आहेत ज्यांना ईडी, सीबीआयच्या नोटिसा आल्या आणि ते लगेच शेपटा घालून भाजपात गेले. भाजपा आज जे काही करत आहे ती औरंगजेबी वृत्ती आहे. फोडा तोडा आणि राज्य करा ही भाजपाची वृत्ती आहे. रोज रोज त्यांच्या पक्षात ते कचरा गोळा करत आहेत असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.

गद्दार खासदारांचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो : इथल्या गद्दार खासदाराला किती वेळ खासदार करायचं? पहिलं आमदार केलं, मग खासदार केलं, इथल्या हिंदुत्ववादी मतदारांनी तीन वेळेस खासदार केलं, तरीही गद्दारी केली. आता या वेळेला गद्दार खासदाराचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो असं उध्दव ठाकरे म्हणाले. ४०০ वर्ष होऊन देखील सूर्याजी, खंडोजी यांच्या कपाळावरील गद्दारीचा टिळा पुसला गेला नाही. मग या गद्दारांच्या कपाळावरील गद्दारीचा टिळा कसा पुसला जाईल असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केलाय. देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही यावेळी उध्दव ठाकरे यांनी बोलून दाखवला. अबकी बार ४०० पार नाही तर अब की बार भाजपा तडीपार हा नारा गावागावात जाऊ द्या असं ठाकरे म्हणाले. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असं ते म्हणाले. तुमची मुले-बाळ स्वातंत्र्यात जगली पाहिजेत की, गुलामीत हे ठरवा असंही ठाकरे म्हणाले. हकुमशाहीला गाडण्याचं आवाहन शेवटी उध्दव ठाकरे यांनी केलंय.

राज ठाकरे यांचा घेतला समाचार : महाराष्ट्रात ठाकरेंची त्यांना इतकी भीती वाटत आहे की, आता आमच्या सगे सोयरांना देखील ते सोबत घेत असल्याचं राज ठाकरे यांचं नाव घेता समाचार घेतला. तसंच कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना तुम्ही माझं ऐकलं. तोंडाला मास्क आणि नियम पाळला होता, तसं यावेळेस सरकार गाडून टाकण्या करता देखील माझं ऐका असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केलंय.

हेही वाचा -

  1. कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही-उद्धव ठाकरे
  2. कलम ३७०; न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, पण काश्मिरी पंडितांच्या सुक्षेची हमी गरजेची, पाकव्याप्त काश्मीरही परत आणा - उद्धव ठाकरे
  3. "घरात बसून काहीही होत नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.