ETV Bharat / politics

आदित्य ठाकरेंच्या बाजूनं आजोबांनी ठोकला शड्डू! हातातून माईक घेतला अन्... - Aaditya Thackeray - AADITYA THACKERAY

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे बुलढाण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान एका आजोबांनी चक्क आदित्य ठाकरेंच्या हातातील माईक घेऊन शाब्दिक फटकेबाजी केली.

Taking the mike from Aaditya Thackeray hand old man criticized BJP
आदित्य ठाकरेंच्या वतीनं आजोबांनी ठोकला लोकसभेचा शड्डू! हातातून माईक घेतला अन्...
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 10:33 PM IST

आदित्य ठाकरे सभा

बुलढाणा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (4 एप्रिल) निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याकरता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज बुलढाण्यात आले होते. अर्ज भरल्यानंतर आयोजित केलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

काय म्हणाले आदित्य ठाकरे : यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "तापमान जसं वाढत चाललंय मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की प्रचार करत असताना पाणी पीत जा, डोक्यावर रुमाल घेत जा आणि स्वतःची काळजी घेत जा. कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल." तसंच आज मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत. मात्र, आज या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? मंत्रिमंडळात एका जणानं सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ केली. अशा मंत्र्यांना खरं तर गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. मात्र, तसं झालं नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आजोबांनी घेतला आदित्य ठाकरेंच्या हातातून माईक : आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच तिथं उपस्थित एका आजोबांनी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. त्याला होकार देत आदित्य ठाकरे यांनी त्यांना थेट स्टेजवर बोलावून घेतलं. यावेळी आदित्य ठाकरेंच्या हातातून माईक घेत आजोबांनी ईडीवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. प्रचाराच्यावेळी अशा काही रंजक घटना घडत असतात. आज या आजोबांनी माईक हातात घेऊन केलेली फटकेबाजी लोकांना चांगलीच आवडल्याचं त्यांच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवरुन दिसत आहे.

हेही वाचा -

  1. आपल्या देशात दररोज 'एप्रिल फुल डे' साजरा होत आहे - आदित्य ठाकरे - Aditya Thackeray criticizes BJP
  2. ईडी, सीबीआय, आयटी, भाजपाचे मित्रपक्ष, आदित्य ठाकरेंचा महायुतीवर निशाणा - Lok Sabha Elections
  3. 'गरिबी हटाव नाही, तर गरीब हटाव', ही भाजपाची नीती; आदित्य ठाकरे यांनी सुनावले खडेबोल - Aditya Thackeray

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.