ETV Bharat / politics

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस वादात आता सुप्रिया सुळेंची उडी, म्हणाल्या, "मला त्यांच्याकडून या अपेक्षा..." - Supriya Sule On Devendra Fadnavis - SUPRIYA SULE ON DEVENDRA FADNAVIS

Supriya Sule On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'कलिंगड' असा केला. तसंच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत 'उद्धव ठाकरेंचा डोक्यावरील ताबा सुटलाय' असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, ठाकरे-फडणवीस वादावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय.

Supriya Sule reaction over Devendra Fadnavis criticism on Uddhav Thackeray, she said it is very sad because our fight is not personal
उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 9:26 PM IST

पुणे Supriya Sule On Devendra Fadnavis : शिवसंकल्प मेळाव्यात बोलत असताना शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले," एखादी व्यक्ती नैराश्यातून जर डोकं बिघडल्यासारखा बोलतो. त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लब'चे सदस्य आहेत." यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : या वादावर प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीसांचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी एक विरोधक आहे. पण तरीही मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचं विधान ऐकून मी खूप नाराज झाले. फडणवीस हे देशाचे तरुण नेते आहेत. ते उपमुख्यमंत्री असून ते भाजपाचे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. आम्ही त्यांना खूप सुसंस्कृत म्हणायचो. पण जेव्हा त्यांनी हिंसाचाराची भाषा वापरली तेव्हा मला खूप वाईट वाटलं."

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? : सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, "आता लढाई मैदानात आहे. मी मुंबईत म्हणालो होतो की, एक तर मी राहीन किंवा ते तरी राहतील. इथं एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आव्हान दिलंय. पण, ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर बोटानं चिरडायचं असतं. मी आव्हान द्यावं इतके मोठे ते नाहीत. काहीजणांना वाटलं की मी त्यांना आव्हान दिलंय. पण हे आव्हान चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे", असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची टीका : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा डोक्यावरील ताबा सुटलाय. ते अत्यंत निराश झाले आहेत. त्या नैराश्यातून ते या प्रकारची भाषा बोलताय. यावर आपण काय उत्तर द्यावं? एखादा व्यक्ती नैराश्यातून जर डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून उद्धव ठाकरे यांनी आपण 'औरंगजेब फॅन क्लब'चे आहोत हे मात्र दाखवून दिलंय."

हेही वाचा -

  1. डोकं बिघडलेल्यांना फार उत्तर द्यायचं नसतं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis
  2. "उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून...", देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका - Fadnavis on Uddhav Thackeray
  3. “अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंचा प्रहार - Uddhav Thackeray on Amit Shah

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.