ETV Bharat / politics

Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."

Supriya Sule On Vijay Shivtare : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवरही टीका केला. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule Reaction On Vijay Shivtare Announcing that he will contest election from Baramati
सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 7:00 PM IST

सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली

पुणे Supriya Sule On Vijay Shivtare : उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसंच यावेळी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही शिवतारेंनी जाहीर केलं. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : पुणे महानगरपालिकेच्या जाचक टॅक्सचा निषेध करण्यासाठी शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागातील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल मोर्चाचं (आहिरागेट ते शिवणे वॉर्ड ऑफीस) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, लोकशाही आहे, आणि त्यामुळं सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पुढं त्या म्हणाल्या की, आज देशात पेटीएम घोटाळा, इलेक्ट्रॉल बाँड घोटाळा होतोय. दुसरीकडे मी नाही तर भाजपानं अशोक चव्हाणांवर आरोप केले होते. आज आदर्श घोटाळा कुठंय? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला.

विजय शिवतारेंचा अजित पवारांनी इशारा : विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. बारामतीतील जनता आता पवार कुटुंबीयांना कंटाळली आहे. त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आहोत, असा इशारा देत शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात अपशब्दही उच्चारले. तसंच यावेळी शिवतारे यांनी आपण पुन्हा एकदा लोकसभा लढणार असल्याचं सांगून अजित पवार गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता या मुद्द्यावरुन विजय शिवतारे विरुध्द राष्ट्रवादी वाद चांगलाच पेटून उठण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Loksabha Election 2024 : कल्याणची जागा जिंकायची आहे ना? अजित पवार गटाचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
  2. शिवसेना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? विजय शिवतारेंनी स्पष्टच सांगितलं
  3. Supriya Sule Reaction : विजय शिवतारे यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.