ETV Bharat / politics

"दादा इज ग्रेट हे सिद्ध झालंय", अजित पवारांच्या 'त्या' विधानावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया - Sunil Tatkare - SUNIL TATKARE

Sunil Tatkare on Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देऊन चूक केल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Sunil Tatkare reaction on Ajit Pawar statement regarding Supriya Sule
अजित पवार आणि सुनील तटकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 10:37 PM IST

मुंबई Sunil Tatkare on Ajit Pawar : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बघायला मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना यश मिळालं तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'तेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक झाली' अशी कबुली एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिलीय. अजित पवार यांनी त्यांची भावना व्यक्त केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

काय म्हणाले सुनील तटकरे? : अजित पवारांच्या वक्तव्यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना सुनील तटकरे म्हणाले की, "अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनौपचारिक केलेलं नाही. त्यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे. यातून दादा इज दादा आणि दादा इज ग्रेट हे सिद्ध झालंय." पुढं विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत. महायुती सरकारनं घोषित केलेल्या योजनांमुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आमच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत."

सुनील तटकरे पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

सामुदायिक संविधान वाचन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुरुवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्ष कार्यालय आणि राज्यभरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील पक्ष कार्यालयात सामुदायिक संविधान वाचन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. तसंच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात देखील सुरुवातीलाच संविधानाची प्रस्तावना अंतर्भूत करण्यात आली होती, असंही ते म्हणाले. पुढं जनसन्मान यात्रेविषयी बोलताना ते म्हणाले की, "या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यास आम्हाला यश आलंय. संविधानासंदर्भात काही लोक फेक नेरेटीव्ह निर्माण करत होते. हा आता भूतकाळ झालाय."

हेही वाचा -

  1. सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा लढतीवर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, "ती माझी चूक.." - Ajit Pawar News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.