ETV Bharat / politics

"2016 मध्येच भाजपाबरोबर जाणार होतो, पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Sunil Tatkare Exclusive - SUNIL TATKARE EXCLUSIVE

Sunil Tatkare Exclusive : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपाबरोबर जाण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. अनेकवेळा भाजपाबरोबर जाण्यासाठी चर्चा केली होती. 2016 मध्येही भाजपाबरोबर जाण्याची आमची चर्चा झाल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय. पण पुढं काय झालं? त्यासाठी वाचा सविस्तर बातमी....

Sunil Tatkare Exclusive
Sunil Tatkare Exclusive (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 8:15 PM IST

Updated : May 9, 2024, 8:41 PM IST

सुनील तटकरे (ETV Bharat Reporter)

पुणे Sunil Tatkare Exclusive : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीकडून भाजपाबरोबर युतीबाबत अनेक वक्तव्य केली जात आहेत. गुरुवारी (9 मे) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. "अनेकवेळा भाजपाबरोबर जाण्यासाठी चर्चा केली होती. 2016 मध्ये आमची चर्चा भाजपाबरोबर झाली. पण आमची भूमिका होती की, आम्ही सत्तेत येऊ पण शिवसेना बाहेर पाहिजे. मात्र, भाजपाची स्पष्ट भूमिका होती की, शिवसेना सोबत राहील आणि सत्तेत देखील ते सोबत असणार आहेत. तुम्ही जर आमच्यासोबत आले आणि जर शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली तर तो त्यांचा प्रश्न राहील. आम्ही शिवसेनेला सरकारमधून बाहेर जा असं म्हणणार नाही," असं सुनील तटकरे म्हणाले. सुनील तटकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं पुढील दोन दिवस तटकरे बैठका घेणार आहेत. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'बरोबर Exclusive संवाद साधला.

...तेव्हा पक्षाचा निर्णय होता : यावेळी तटकरे म्हणाले की, "2016 मध्ये शिवसेनेबरोबर न जाण्याचा निर्णय हा पक्षाचा निर्णय होता. आता आम्ही ज्या शिवसेनेबरोबर आहोत ती त्यावेळेसची शिवसेना नाही. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी शिवसेना आहे, ती महायुतीबरोबर आहे. तेव्हाचा निर्णय हा एकत्रित असलेल्या शिवसेनेबाबतीत होता. त्यावेळेसची शिवसेना ज्यांना नको होती, तेच लोकं आता त्याच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीत एकत्र आहेत," असं म्हणत सुनील तटकरे यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.

महायुतीला जनतेचा मोठा पाठिंबा : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 तारखेला पूर्ण झालं आणि चौथ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं, त्या 11 लोकसभा मतदार संघातील आढावा घेत असताना महायुतीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळालाय. महायुतीतील घटक पक्षातील सर्वच कार्यकर्त्यानं काम केलंय. सुरुवातीला काही अडचण आल्या होत्या, पण प्रदेश पातळीवर योग्य समन्वयक झाल्यानं चांगलं काम झालं असून, तिन्ही टप्प्यात आम्हाला चांगलं यश मिळणार असल्याचा विश्वास तटकरेंनी व्यक्त केलाय.

जागा वाटपावर चर्चाही झाली होती : राष्ट्रवादीबाबत नेहमी संभ्रम निर्माण करण्यात आला. आम्ही का भूमिका घेतली? याबाबत अनेकदा आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे. 2014 मध्येच आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. तसंच त्यांनी पाठिंबा मागितलासुद्ध नव्हता. तेव्हा सरकारमध्ये जायचं होतं. तसंच 2016 मध्ये देखील भाजपाबरोबर जायचं होतं. फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मंत्रिपद तसंच 2019 च्या जागा वाटपाबाबत देखील चर्चा झाली होती. पण, आता निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला गेला असला तरी मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचं तटकरे म्हणाले.

बारामतीत पवारच जिंकणार : अजित पवार यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्यावर तटकरे म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांनी जी भूमिका घेतली तिच आमची भूमिका आहे. आता यात अजून काय सांगायचं? नुकतीच निवडणूक पार पडलेल्या बारामतीत पवार हेच विजयी होणार आहेत. बारामतीची निवडणूक ही पवार विरुद्ध सुळे होती आणि आता यात विजय पवार यांचा होणार असल्याचा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी सांगितला थेट आकडाच! - Lok Sabha Election 2024
  2. मोदी-शाहांमुळं शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? - CM Eknath Shinde Shivsena

Last Updated : May 9, 2024, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.