ETV Bharat / politics

सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन - Sudha Murty

लेखिका सुधा मूर्ती या लवकरच राज्यसभेत खासदार म्हणून दिसणार आहेत. त्यांचे नामांकन झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

Sudha Murty news
Sudha Murty news
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 1:27 PM IST

Updated : Mar 8, 2024, 2:12 PM IST

नवी दिल्ली- इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद वाटतोय. सामाजिक कार्य, दातृत्व आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधा यांचे योगदान प्रचंड असून प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती 'नारी शक्तीचं सामर्थ्य दर्शविणार असेल. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा. आहेत."

कोण आहेत सुधा मूर्ती? सुधा मूर्ती यांना एप्रिल २०२३ मध्ये पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांचे पती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आहेत. कोट्यवधींची संपत्ती असलेले मूर्ती दाम्पत्य हे साधेपणासाठी ओळखले जाते. त्यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ऋषी सुनक यांनी 2009 मध्ये अक्षता मूर्तींशी लग्न केले. अक्षता या ब्रिटनमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. त्यांचे चिरंजीव रोहन हे सोरोको स्टार्टअपचे संस्थापक आहेत. सुधा मूर्ती यांनी साहित्यक्षेत्रातही ठसा उमटविला आहे. त्यांनी आठ कांदबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून नीतीमत्ता आणि लहान मुलांवरील संस्काराचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसून येते. टेल्को कंपनीत नोकरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत.

अब्जाधीश संपत्तीची आहे मालकी

  • नारायण मूर्ती यांना इन्फोसिस कंपनी सुरू करण्यासाठी सुधा मूर्ती यांनी 10 हजार रुपयांची मदत केली होती. ही माहिती लेखिका सुधा यांनी एका मुलाखतीत दिली होती. इन्फोसिस ही अब्जावधीची उलाढाल करणारी जगातील बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी आहे.
  • सुधा मूर्ती यांना गतवर्षी इंडो कॅनडियन कार्यक्रमात कॅनडा इंडिया फाउंडेशननं 'ग्लोबल इंडियन अवॉर्ड' देऊन सन्मानित केलं. या पुरस्काराची रक्कम $50,000 आहे. बक्षीस जाहीर होताच त्यांनी ही रक्कम द फील्ड इन्स्टिट्यूटला (टोरंटो विद्यापीठ) विद्यापीठाला दान करून दानशुरपणाचं दर्शन घडविलं होतं.
  • नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याकडं 730 दशलक्ष पौंड संपत्ती आहे. अक्षता यांची जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये गणना होते.

हेही वाचा-

Last Updated : Mar 8, 2024, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.