ETV Bharat / politics

शरद पवारांची चाणाक्य नीती त्याला उद्धव ठाकरेंची साथ, पडली महायुतीवर भारी; 45 पार म्हणणारे सपशेल फेल - Lok Sabha Result 2024 - LOK SABHA RESULT 2024

LOK SABHA RESULT 2024 : मंगळवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात भाजपाप्रणीत एनडीएला देशात बहुमत मिळालं असलं तरी राज्यातील लेकसभेच्या निकालानं सर्वांना धक्का देत संपूर्ण चित्रच पालटून टाकलंय.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 8:01 PM IST

मुंबई LOK SABHA RESULT 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालानं संपूर्ण चित्रच पलटून टाकलंय. असली शिवसेना, असली राष्ट्रवादी याबाबतचा निर्णय जनतेनं ईव्हीएममधून दिलाय. राज्यात निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतरही आम्हीच सर्वात जास्त जागा जिंकणार अशा अविर्भावात असलेल्या महायुतीच्या नेत्यांना मतपेटीतून जनतेनं त्यांची जागा दाखवून दिलीय. महायुतीचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी आखलेली रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत चाणाक्यची भूमिका निभावल्यानं महाविकास आघाडीला घवघवीत यश संपादन केलंय.

ना उद्धव ठाकरे डगमगले ना शरद पवार : मागील दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं ती सर्व परिस्थिती पाहता यंदा लोकसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूनं कौल देते हे बघणं फार महत्त्वाचं होतं. न्यायालयीन लढाईत अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे जरी विजयी झाले असले तरी सुद्धा जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं असणार यावर असली आणि नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं भवितव्य अवलंबून होतं. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दगा देत शिवसेनेत फूट पाडली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुतीत सामील झाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या हे किती पचनी पडलं होतं, याचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच लागणार होता. पक्षात इतकी मोठी फूट पडूनही ना उद्धव ठाकरे डगमगले ना शरद पवार. आपल्या चाणाक्य नीतीचा वापर करत त्यांनीही महायुती विरोधात विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आपली रणनीती आखली, आणि त्यात ते यशस्वी झाले.

शिंदे-अजित पवार मूग गिळून गप्प : लोकसभा निवडणुकीत आपणच मोठा भाऊ असून आपल्या म्हणण्यानुसार तुम्हाला वागावं लागेल अशाच अविर्भावात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वागले. जागावाटपाचा तिढा, उमेदवारांची अदलाबदली, नेत्यांची नाराजी या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनीच हाताळल्या. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाचं असणारं पाठबळ व राज्यातील त्यांची ताकद या कारणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मूग गिळून गप्प होते. पण अखेर निकालामध्ये जी काही पीछेहाट झाली ती पाहता देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पूर्णपणे निष्फळ ठरली असून त्याचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागलाय. मागच्या निवडणुकीत 1 जागेवर समाधान मानावं लागणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत 13 जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा जिंकून आल्या आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागी विजय मिळालाय. दुसरीकडे अबकी बार महाराष्ट्रात 45 पार असा नारा देणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलंय.

पाय जमिनीवर डोकं शांत : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आखलेल्या रणनीतीला अशा पद्धतीनं यश येईल हे स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे चंद्रपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, भिवंडी, बीड, परभणी, कोल्हापूर, बारामती, सोलापूर, अहमदनगर, नाशिक या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार तसंच नाना पटोले यांनी एकत्र येत जी रणनीती आखली त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले. राजकारणातले चाणाक्य समजले जाणारे शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली चाणाक्य नीती सिद्ध करुन दाखवली आहे. याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, शरद पवारांनी असा करिष्मा यापूर्वीही अनेकदा करुन दाखवलाय. परंतु यंदा परिस्थिती वेगळी होती. ही खरोखरच त्यांच्यासाठी त्यांच्या खानदानासाठी, पवार कुटुंबीयांसाठी अस्तित्वाची लढाई होती. अशा परिस्थितीत भाजपानं सर्व ताकद पणाला लावलेली असताना साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गाचा अवलंब केलेला असताना सुद्धा पाय जमिनीवर, डोकं शांत ठेवून शरद पवारांनी या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवत चाणाक्य नीती अवलंबली. याकरता उद्धव ठाकरे यांची लाख मोलाची साथ त्यांना मिळाली. भाजपानं आक्रमकरित्या केलेल्या शाब्दिक हल्ल्याला त्यांनी तेवढ्याच शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कुठंही बडेजाव न करता त्यांनी शांत, संयमानं ही निवडणूक हाताळली. याचं घवघवीत यश त्यांना मिळालं. शेवटी कितीही झालं तरी जनता जनार्दन असते हे पवार साहेबांनी कधीच ओळखलं असल्यानं त्या पद्धतीनं त्यांनी रणनीती आखली होती, असंही माईणकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. आता स्थापन होणारं सरकार हे युतीचं सरकार असेल, कशाप्रकारे असू शकतं भाजपा युतीचं सरकार? - LOK SABHA ELECTION RESULTS 2024
  2. पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.