ETV Bharat / politics

सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर, नवीन मतदारांमध्ये झाली वाढ - State Election Commission

Voter list Released : यंदा लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलीय.

State Election Commission
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 7:34 PM IST

मुंबई Voter list Released : २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या धरतीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ यादरम्यान राबविण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (२३ जानेवारी २०२४) रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. दरम्यान, मतदारांची ही यादी मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलीय.

अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरुच राहणार : सर्व्हेक्षणा दरम्यान राज्यातील नवीन मतदार वाढला आहे. नवीन मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत. तसेच मतदारांची ही नवीन यादी राज्यातील राजकीय पक्षांना देखील देण्यात येणार आहे. तसेच मतदारांनी आपले नाव बरोबर आहे का, किंवा नावात काही बदल करायचा असल्यास संकेतस्थळावर करु शकता. तसेच जरी मतदार अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी, अद्ययावतीकरण प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलीय.

एप्रिलमध्ये १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या मतदान करता येणार : मतदार व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडू शकता. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या तरुण किंवा तरुणीच वय एप्रिल महिन्यात १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा तरुण-तरुणींना आगाऊ नोंदणी करता येणार आहे. तसेच त्यांनाही एप्रिलनंतर मतदान करता येणार आहे. यामुळं नवीन मतदारांच्या संख्येत वाढ होणार आहे. ही मतदार यादी अद्ययावत करून, संकेतस्थळावर आणि मतदार केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलंय.

एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७ : या सर्व्हेक्षण उपक्रमांतर्गत २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाल्या. अंतिम मतदार यादीत ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची वाढ झाली आहे. एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झालेली आहे. यामध्ये ३ लाख ०८ हजार ३०६ स्त्री मतदारांची नोंद झाली आहे, तर १ लाख ०१ हजार ८६९ पुरुष मतदार आहेत. तसेच ५७२ तृतीयपंथी मतदारांची वाढ झालेली आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्यामुळे महिलांच्या मतदार नोंदणीत वाढ : या सर्व्हेक्षण उपक्रमामध्ये गृहनिर्माण सोसायटी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या सहकार्यामुळं आणि मदतीमुळं मतदारांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. असं मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. तसेच अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळं यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळं मतदार यादीतील स्त्री-पुरुषांचे प्रमाण ९१७ वरून ९२२ इतके वाढले आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरामुळं या मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसून येतंय.

सर्व्हेक्षण मोहीम घरोघरी राबवली : ही सर्व्हेक्षण मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात आलीय. या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भटक्या आणि विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच शिबिरामध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही भटक्या आणि विमुक्त जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. भटक्या आणि विमुक्त जमातीच्या एकूण १६ हजार ४४३ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली. ११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच मतदार यादीमध्ये ९ लाख ०५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार निदर्शनास आले. याबाबतही तपासणी आणि सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात शिबिरं : मुंबई शहर, मुंबई आणि उपनगर, नाशिक, वाशीम, हिंगोली, कोल्हापूर, ठाणे, नांदेड, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, धाराशिव, जालना, सोलापूर, अमरावती, सांगली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्येही मतदानाबद्दल शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये यंदाच्या अंतिम मतदार यादीत कातकरी (काथोडी), माडिया गोंड, कोलाम या समाजातील ३८,८७६ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व सर्व्हेक्षणानंतर २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपलं नाव तपासावं, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकातं देशपांडे यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. अनोखी तडजोड; चेंबूरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकाच शाखेत एकत्र बसणार
  2. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली मराठा आरक्षणविषयक ऑनलाईन बैठक; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' निर्देश
  3. पुण्यात मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला तुफान गर्दी, आरक्षणासाठी जरांगे यांची मुंबईकडं कूच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.