नागपूर Kailash Kher On PM Narendra Modi : सोमवारी लाखो रामभक्तांच्या उपस्थितीत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (22 जानेवारी) भगवान श्री राम भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर म्हणाले की, 'भारतासाठी आता राम राज्याची वेळ आली आहे, यालाच रामयुग म्हणता येईल.' खेर यांनी नागपुरात 'ईटीव्ही भारत'शी बातचीत केली.
राम राज्याची सुरुवात झाली आहे : भारताने अनेक संकटांचा सामना केलाय. अनेक संकटे पाहिली आहेत. भारताला मोठे धक्के बसले आहेत. पण आता भारताची वेळ आली आहे. तसेच रामराज्य सुरू झालं असल्याचं कैलाश खेर म्हणाले. जो स्वतः जागतो तो तुम्हाला जागं करतो. सोमवारचा दिवस तमाम भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस होता. जेणेकरून सर्वांना कळेल 'माझा भारत काय आहे', 'आपण कोणाचे अपत्य आहोत'. आपण ऋषींमुनी, संतांचे अपत्य आहोत. म्हणूनच आपल्या धर्माला सनातन म्हणतात. आपली संस्कृती प्राचीन आहे. भारत ही आपली सर्वात जुनी सभ्यता आहे. आपण आता जागे झालो नाही तर कधी जागे होणार. समोवारचा दिवस अतिशय दिव्य होता. जो माझ्या देवाने निर्माण केला होता, असं मत कैलाश खेर यांनी व्यक्त केलंय.
पंतप्रधानांची निवड देवांनी केली : पंतप्रधान मोदी हे काही सामान्य माणूस नाहीत, त्यांना देवांनी निवडलेलं आहे. त्यांच्याकडं एक दैवी शक्ती आहे. आज भारत प्रत्येक क्षेत्रात जी प्रगती करत आहे, त्यामागं पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे. प्रत्येक क्षेत्रात ते भारताला पुढे नेत आहेत. ते संतांनाही प्रभावित करत आहेत, ते एक तपस्वी आत्मा आहेत. देवांनी त्यांची निवड महान मार्गदर्शकाच्या रूपात केली आहे की, 'जा आता रामराज्य सुरू कर' तसंच भारताला श्रेष्ठ बनवा, असं परखड मत कैलाश खेर यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -