ETV Bharat / politics

पंतप्रधानांनी मागितली माफी पण फडणवीसांनी का नाही?; सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 6:30 PM IST

Updated : Aug 31, 2024, 6:37 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. मात्र, यावरून विरोधकांनी सरकारला घेरलंय.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source - ETV Bharat)

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्या प्रकरणी काल पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची व शिवप्रेमींची माफी मागितली. परंतु ही माफी मागितल्यानंतर त्यांनी वीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. "ज्यांनी वीर सावरकरांचा वारंवार अपमान केला, ते अजून माफी मागत नाहीत," असं पीएस मोदी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांच्या माफी नाम्यावरून आता राजकारण तापलं असून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांनी अटी शर्तीवर माफी मागितली आहे, असा विरोधकांनी केला.

राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी केलेला आक्रोश पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुतळा कोसळल्याबद्दल माफी मागितली. शिवप्रेमी आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जात, मुख्यमंत्री म्हणाले की, "गरज पडल्यास शिवरायांची शंभर वेळा माफी मागण्यास तयार आहे. विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे आहेत. पण त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावं."

शिव्या देऊन अपमानित करत असतात : राज्यातील या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात बंदराच्या भूमिपूजन समारंभात आपण डोकं टेकवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्याचं सांगितलं. त्यांनी शिवभक्तांचीही माफी मागितली. पण नंतर बोलताना ते म्हणाले की, "भारत मातेचे आणि महाराष्ट्राचे महान सुपुत्र वीर सावरकरांचा प्रत्येक वेळी अपमान करणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करणारे माफी मागण्यास तयार नाहीत. उलट न्यायालयात जाऊन लढाई लढण्याची त्यांची तयारी आहे. महाराष्ट्रातील जनतेने अशा लोकांचे संस्कार जाणून घ्यावेत, आमचे संस्कार वेगळे आहेत." असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करायला हवी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्या बरोबर वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केल्यानं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली आहे. त्यांनी मधेच सावरकरांना आणलं. पंतप्रधानांच्या अशा वागण्यानं ते शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना तर करत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतोय. पंतप्रधान आणि भाजपाला महाराजांच्या पुतळ्याचा फक्त इव्हेंट करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, अस्मिता आहेत. नुसती माफी मागून चालणार नाही. घडलेल्या घटनेमुळे मराठी माणूस संतप्त आहे. पंतप्रधानांनी माफी मागून काही फायदा होणार नाही. त्यांनी झालेल्या घटनेसंदर्भात जबाबदारी निश्चित केली पाहिजे."

सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? : पंतप्रधानांच्या माफी नाम्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधानांनी शिवरायांची माफी केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मागितली. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. पंतप्रधानांना आम्ही 6 सोनेरी पान पुस्तक वाचायला देऊ. काँग्रेसनं यावर काय करायचं हा काँग्रेसचा प्रश्न आहे. तुम्ही वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? उलट तुम्हीच त्यांची माफी मागायला हवी."

फडणवीसांनी अद्याप माफी मागितली नाही : या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले, "5 ते 6 फुटांच्या पुतळ्याला कला संचालनालयानं परवानगी दिली असताना नवोदित शिल्पकारानं 35 फुटांचा पुतळा उभारला. मूर्तिकार आपटे फरार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा बिनशर्त माफी मागितली नाही. सावरकरांचा मुद्दा मध्येच घुसवून माफी मागितली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवप्रेमींना खूश करण्यासाठी त्यांनी माफी मागितली. त्यांनी या पुतळ्याच्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य करायला हवं होतं. या घटनेबाबत सर्वात अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप या प्रकरणावर माफी मागितली नाही," असं म्हणत विकास लवांडे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची सवय : विरोधकांकडून होणाऱ्या टिकेला भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडलेल्या घटनेबाबत जाहीरपणे माफी मागतो असं म्हटलं. यावेळी त्यांनी वीर सावरकरांचा नेहमी अपमान करणाऱ्यांनी कधीच माफी मागितली नाही, इतकंच म्हटलं. विरोधक याबाबत केवळ राजकारण करत आहेत.

या विषयावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, "लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत हा पुतळा बसवला गेला तर नाही ना? अशी शंका उपस्थित होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या घटनेत पंतप्रधानांनी वीर सावरकर यांचा मुद्दा आणायची गरज नव्हती. पंतप्रधानांनी नको तो मुद्दा छेडला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेलं एखादं वक्तव्यं याचा काहीच संबंध नाही. संघपरिवाराला वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची सवय झाली आहे, अशी टीका जयंत माईणकर यांनी पंतप्रधानांवर केली.

हेही वाचा

  1. झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांचा आक्षेप; सुरक्षेतही काय चाललंय राजकारण? वाचा स्पेशल रिपोर्ट - objection on Z Plus security
  2. पंतप्रधान मोदी यांनी फक्त 'राजकीय माफी' मागितली, मनापासून नाही - संजय राऊत - Sanjay Raut on Modi
  3. 'लाडक्या' बहिणींसाठी मुख्यमंत्री आज नागपुरात; महामेळाव्याची तयारी पूर्ण, वाहनधारक भावांना मात्र होणार मनस्ताप - Eknath Shinde Visit To Nagpur

Last Updated : Aug 31, 2024, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.