ETV Bharat / politics

ठरलं! 'वंचित'चा स्वबळाचा नारा; प्रकाश आंबेडकर 'या' तारखेला भरणार अकोलामधून उमेदवारी अर्ज - Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पक्षप्रवेश आणि बैठकांचं सत्र वाढलंय. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याकारणानं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपला वेगळा पर्याय निवडलाय.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 6:06 PM IST

Updated : Mar 24, 2024, 6:51 PM IST

प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर

मुंबई Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचं सर्व प्रयत्न असफल झाले. शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलाय. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीनं 27 मार्चला अकोला मतदारसंघातून (Akola Lok Sabha Elections) उमेदवारी भरणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. त्याचबरोबर महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीसाठी दिलेल्या चार जागाही त्यांनी परत केल्याचंही सांगितलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

शेवटपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. आंबेडकरांसोबत युती करण्याबाबत अनेक प्रयत्न झाले. परंतु, शेवटपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याकारणानं, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर न जाण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत माध्यमांसमोर आपली नाराजी बोलून दाखवताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्ही केलेल्या मागणीला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत अद्याप त्यांचा निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबत आमचे काही जागेवर मतभेद आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु, ज्या मतदारसंघांमध्ये मतभेद आहेत, तेथे उमेदवार जाहीर केले नाहीत. शिवसेनेने सुद्धा काही जागांवर दावा केला असून तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आम्ही पुन्हा चर्चा करू."

महाविकास आघाडीत १५ जागांवर वाद : महाविकास आघाडीबरोबर युती तोडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीला त्यांच्या 4 जागा मी परत करत आहे. आम्हाला 4 जागा दिल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात अकोला आणि उर्वरित दोन जागा त्यांनी आम्हाला ऑफर केल्या आहेत. म्हणून त्यांनी खोटं बोलणं थांबवावं. तसेच महाविकास आघाडीमध्येच अजून 15 जागांचा तिढा कायम असताना मी तरी कुठे त्यांच्याकडं जागा मागणार?" असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्याचबरोबर येत्या 27 तारखेला अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही म्हटलंय.

भाजपाची ताकद आता संपली : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "सध्या सर्वच पक्षांमध्ये फोडाफोडीचं आणि उमेदवार पळवापळवीचं राजकारण सुरू आहे. यावरून भाजपाची ताकद समजते. भाजपाची ताकद आता राहिली नाही. 2014 ची त्यांची ताकद आता संपली आहे. या कारणानेच समोरच्या पक्षांना कमकुवत करत आपण निवडणूक जिंकू अशी स्थिती निर्माण करायची ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे."

हेही वाचा -

  1. नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency
  2. "त्यांच्याकडे पैलवान आहेत तर आमच्याकडे वस्ताद"; आमदार रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना डिवचलं - Ravindra Dhangekar
  3. पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय तिसऱ्यांदा लढविणार निवडणूक, वाराणसी मतदारसंघात काय आहेत समीकरणे? - varanashi lok sabha elections

Last Updated : Mar 24, 2024, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.