ETV Bharat / politics

राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut - SANJAY RAUT

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असते तर आम्हाला 20 ते 25 जागा जास्त मिळाल्या असत्या, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

Sanjay Raut
संजय राऊत (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 4:34 PM IST

पुणे Sanjay Raut : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचं सरकार आलं असून या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीला देखील 240 जागा मिळाल्या आहेत. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी असते तर आमच्या 20 ते 25 जागा वाढल्या असत्या असं संजय राऊत म्हणाले. पुण्यात आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

संजय राऊत (ETV Bharat Reporter)
लाडका भाऊ का नको : शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवारांवर टीका होत आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "लाडकी बहीण असेल तर मग लाडका भाऊ का नको? आज या राज्याचे असंख्य भाऊ हे बेरोजगार आहेत. महाराष्ट्राचा रोजगार हा गुजरातला वळवला जात आहे. यामुळं आता घराघरातील तरुण हे बेरोजगार होत आहेत. पुण्यासारख्या शहरात असंख्य भाऊ हे ड्रग्जच्या विळख्यात आले आहेत. याबाबत सरकार भूमिका घेताना दिसत नाही. आज पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्जच केंद्र बनलं आहे. नशेच्या आहारी एक पिढी जाताना दिसत आहे. आज सगळं ड्रग्ज हे गुजरात वरून येत आहे."

विधानसभेत आम्हीच जिंकणार : विधानसभेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे असं राऊत म्हणाले होते. यावर पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर राऊत म्हणाले,"राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. कोणतीही संस्था ही बिनचेहेऱ्याची असू नये. आपण कोणाच्या नावानं मतदान मागत आहोत हे लोकांना कळायला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लवकरच बसून याबाबत निर्णय घेऊ." तसंच आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यात एकत्र निवडणूक लढवणार आहोत. साधारणतः हा 175 ते 180 जागा या आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन फडणवीस यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं संजय राऊत म्हणाले. या राज्यातील जनतेनं त्यांचं नेतृत्व तसंच त्यांच्या आघाड्या या धुडकावून लावल्या आहेत. ते स्वतःला नाना फडणवीस यांचा मोठे भाऊ समजत होते. नाना फडणवीस साडेतीन शहण्यापैकी एक होते. पण फडणवीस हे त्यांच्यातील नाही, असंही यावेळी राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. पावसाळी अधिवेशन 2024 : राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करणार : मुख्यमंत्री - Maharashtra Monsoon Session 2024
  2. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पातून जनतेला काय मिळालं? शरद पवारांचा सवाल - Maharashtra Budget 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.