ETV Bharat / politics

बडनेरात 'बंड'; दिवंगत आमदाराच्या पत्नी कडाडल्या, "मातोश्रीच्या सन्मानासाठी..." - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघामधून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यामुळं आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रीती बंड नाराज झाल्या आहेत.

Shivsena UBT Leader Priti Band will contest as independent candidate in Badnera Assembly Constituency
प्रीती बंड, उद्धव ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 11:12 AM IST

Updated : Oct 27, 2024, 2:41 PM IST

अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. त्यातच बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांचा पराभव करण्यासाठी माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या सक्षम उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र, असं असतानाच बुधवारी (23 ऑक्टोबर) शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बडनेराच्या जागेसाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळं प्रीती बंड नाराज झाल्या आहेत. त्यानंतर आता बंड यांनी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीनं घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

पक्ष आदेशानं लागल्या होत्या कामाला : 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत एका जाहीर सभेत प्रीती बंड यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध प्रीती बंड यांनी गत निवडणुकीत 74 हजार 919 मतं घेतली. तेव्हा त्यांचा 15 हजार 541 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार त्या कामाला लागल्या होत्या. मात्र, ऐनवेळी तिकीट कापल्याची खंत प्रीती बंड यांनी व्यक्त केली.

प्रीती बंड यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

मातोश्रीच्या सन्मानासाठी लढा : यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना प्रीती बंड म्हणाल्या की, "बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी सातत्यानं 'मातोश्री' विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीचा सातत्यानं अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि मातोश्रीच्या सन्मानासाठी माझा हा लढा आहे." तसंच सोमवारी (28 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानं प्रीती बंड नाराज; म्हणाल्या...
  2. बडनेरा मतदारसंघात रवी राणाच 'किंगमेकर', जाणून घ्या या मतदारसंघाचा इतिहास
  3. अडसूळ विरुद्ध राणा कुटुंबातील वाद चिघळण्याची शक्यता; कॅप्टन अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - Navneet Rana vs Anandrao Adsul

Last Updated : Oct 27, 2024, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.