ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरे देव माणूस, तर एकनाथ शिंदे...", उमेदवारी डावललेल्या श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली खदखद - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट शिवसेनेकडून कापण्यात आलंय. त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं वनगा नाराज झाले आहेत.

Shivsena MLA Shrinivas Vanga got emotional after Eknath Shinde denied election his ticket for Palghar Assembly Election
श्रीनिवास वनगा, एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 7:21 AM IST

पालघर : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पालघर विधानसभा मतदारसंघातून पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली आहे. राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यावेळी वनगा यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही तिकीट कापण्यात आल्यानं श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला. तसंच अतिशय भावविवश होऊन त्यांनी प्रामाणिकपणाचं हेच फळ का?, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंची मागितली माफी : यासंदर्भात माध्यमांशी बोलत असताना श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागितली. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी वनगा यांना उमेदवारी दिली होती. लोकसभेच्यावेळीदेखील दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी पाळला. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रीनिवास यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी पाळला नाही, अशी खदखद वनगा यांनी बोलून दाखवली. तसंच यावेळी त्यांनी साथ सोडून गेल्याबद्दल उद्धव ठाकरेंची माफीही मागितली. "उद्धव ठाकरे हे अतिशय प्रामाणिक आणि शब्द पाळणारे नेते आहेत. परंतु माझ्याकडून चूक झाली. मी शिंदे यांच्यासोबत गेलो. त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, तो पाळला गेला नाही", असं वनगा म्हणाले.

भाजपाकडूनही फसवणूक झाल्याची मांडली व्यथा : "पूर्वीही भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यावेळी मला डावलण्यात आलं. माझ्या वडिलांपासून केलेल्या प्रामाणिकपणाचं हेच फळ आम्हाला मिळालंय," अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. "उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते. ते दिलेला शब्द पाळत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यावर मी विश्वास ठेवला. विश्वासघात झाला," असंही ते म्हणाले. हीच भावना श्रीनिवास यांच्या पत्नीनंही व्यक्त केली.

ठाकरेंना तोंड कसं दाखवू? : ठाकरे यांची फोन करून माफी मागणार का किंवा त्यांना भेटणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता श्रीनिवास यांना अश्रू अनावर झाले. कोणत्या तोंडानं त्यांच्यासमोर जाऊ? अशी विचारणा करत देव माणसाची नकळत का होईना माझ्याकडून फसवणूक झाली. "ज्यांच्याबरोबर गेलो त्यांनी तर विश्वासघातच केला, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांचं कौतुक केले. शिंदे यांच्यावर विश्वासघातकीपणाचा आरोप केला.

...तर आम्ही काय करायचं? : "श्रीनिवास वनगा यांनी कालपासून जेवण सोडलंय. ते कुणाशी बोलत नाहीत. आत्महत्या करू, असं ते सांगताय", असा दावा त्यांच्या आईनं आणि पत्नीनं केलाय. तर, त्यांच्या आईनं "माझ्या मुलानं काही बरेवाईट केलं, तर आम्ही काय करायचं?", असा सवाल केलाय.

हेही वाचा -

  1. पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपसलं बंडाचं हत्यार; विक्रमगडमधून निवडणूक लढवण्याचा निर्धार
  2. शिवसेनेनं 15 उमेदवारांची यादी केली जाहीर; भाजपा नेत्या शायना एनसींना शिवसेनेकडून तिकीट
  3. शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी, आदित्य ठाकरेंविरोधात 'हा' तगडा उमेदवार रिंगणात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.