ETV Bharat / politics

"अमोल कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडावं लागतं, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ..", शिवाजीराव आढळरावांचा आरोप - Shirur Lok Sabha Constituency - SHIRUR LOK SABHA CONSTITUENCY

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत मला तीन ते साडेतीन लाख मतांची लीड मिळणार आहे. शिरुर मतदारसंघाच्या जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचा विश्वास शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांना खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Shirur Lok Sabha Constituency
शिरुरच्या जनतेच्या माझ्यावर विश्वास; मला तीन लाखांहून अधिक मतांची लीड मिळेल; आढळराव पाटीलांचा विश्वास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 10:28 AM IST

शिरुरच्या जनतेच्या माझ्यावर विश्वास

पुणे Shirur Lok Sabha Constituency : शिरुर मतदारसंघाच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचा लीड मला मिळणार असल्याचा विश्वास शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते.

अमोल कोल्हेंवर टीका : जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. याबाबत आढळराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं पाण्याची जास्त पाणीटंचाई निर्माण झालीय. आमच्या काही संस्था तसंच काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं. त्या गावात आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःच काहीही दिसत नाही. स्वतःचा तालुक्यातील त्यांनी घेतलेल्या दत्तक गावात काही नाही. ते राज्याचं काय सांगत आहेत?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत अमोल कोल्हेंवर टीका केलीय.

कोल्हेंचं कर्तव्य मलाच पार पाडावं लागतंय : शिरुर मतदार संघाच्या प्रचाराच्या बाबतीत आढळराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "जे प्रकल्प पाच वर्षापूर्वी होते, ते देखील आत्ता आहेत. त्याच परिस्थितीत आहेत. लोक सकाळपासून मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. तसंच मी खासदार नसताना देखील काम करत आहे. कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडावं लागत असल्याचं," यावेळी आढळराव पाटील म्हणाले.

हेही वाचा :

  1. लोकसभेत एकमेकांविरोधात, मात्र समोर येताच अमोल कोल्हेंचा आढळराव पाटीलांना पाया पडून नमस्कार! - Shirur Lok Sabha Constituency
  2. "काका राजकारणात नाही म्हणून..?" अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक सवाल - amol kolhe

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.