ETV Bharat / politics

ठाकरे गटाकडून १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कोणत्या मतदारसंघात मिळाली संधी? - Thackeray group candidates list - THACKERAY GROUP CANDIDATES LIST

Thackeray group Candidates बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. ठाकरे गटानं दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Shiv sena UBT releases first list
Shiv sena UBT releases first list
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 9:33 AM IST

Updated : Mar 27, 2024, 10:11 AM IST

मुंबई Thackeray group Candidates - शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. ठाकरे गटाकडून २३ जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

  • सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू होती. विश्वजीत कदम हे काँग्रेसच्या जागेसाठी आग्रही आहेत. चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
  • रायगडमध्ये अनंत गीतेंना संधी देण्यात आली आहे.
  • चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अंबादास दानवे हे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते.
  • धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
  • मावळमधून संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटानं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे.
  • सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटानं तिकीट दिलं आहे. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी हा महाविकास आघाडीत डोकेदुखीचा विषय ठरला होता.
  • दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून विनायक राऊत हे लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत.
  • शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
  • बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत.
  • नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर ठाण्यातून राजन विचारे यांना संधी देण्यात आलेली आहे.
  • यवतमाळ-वाशिमध्ये संजय देशमुख, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, मुंबई-ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई-वायव्यमधून अमोल कीर्तिकर आणि परभणीमधून संजय जाधव हे ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण मध्यची उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचितबरोबर चर्चेसाठी आम्ही थांबलो आहोत-संजय राऊत- खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, " काँग्रेसची यादी घेतली तेव्हा कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यांच्या यादीबाबत कोणताही वाद केला नाही. हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा आहे. सांगलीच्या जागेबाबतचा वाद संपला आहे. आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडीसाठी थांबलो आहोत. आजही थांबलो असून चर्चा होऊ शकते, अशी आमची भूमिका आहे. देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर असावेत, अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक जागेवर लढाईसाठी संघर्ष असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाराणशीमध्ये लढण्यासाठी संघर्ष करावे लागेल. प्रत्येक जागेवर जिंकण्यासाठीच आम्ही उतरणार आहोत, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-

  1. ठरलं! ठाकरे गटाची 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections
  2. भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी, सोलापुरातून राम सातपुते रिंगणात - BJP Releases 5th List
  3. रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list

Last Updated : Mar 27, 2024, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.