ETV Bharat / politics

मुंब्य्रामधील शिवसेनेची 'ती' शाखा झाली तयार; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखेतून होणार कामकाज - Mumbra Shiv Sena Shakha - MUMBRA SHIV SENA SHAKHA

Mumbra Shiv Sena Shakha : ठाण्यातील मुंब्य्रात शिवसेना शाखेवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावेळी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. आता मुंब्य्रात शिवसेनेची नवीन शाखा राजन किणे (Rajan Kane) यांच्यावतीनं नव्यानं बांधण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) या शाखेतून कामकाज होणार आहे.

Mumbra Shiv Sena Shakha
शिवसेनेची शाखा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 10:44 PM IST

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते राजन किणे

ठाणे Mumbra Shiv Sena Shakha : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असा आमना सामना पाहायला मिळाला. त्यातच शिवसेना शाखा कोणाची यावरून देखील मुंब्रा आणि ठाण्यात वाद पाहायला मिळाला होता. मात्र, त्याच मुंब्र्यात शिवसेनेचे नेते राजन किणे (Rajan Kane) यांनी शाखा पाडून ताबा घेतला असल्याचा आरोपावरून मुंब्र्यात रान पेटलं होतं.

शाखेतून होणार कामकाज : स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील या शाखेकडं पाहणीसाठी आले होते. त्यावेळी देखील मोठे शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडून पाहण्यास मिळाले होते. मात्र, आता खऱ्या अर्थानं त्याच जागी शिवसेनेची नवीन शाखा राजन किणे यांच्यावतीनं नव्यानं बांधण्यात आलीय. लोक उपयोगी कामकाज देखील सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) या शाखेतून कामकाज होणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या शिवसेना शाखेला पुन्हा एकदा महत्व मुंब्र्यामध्ये पाहायला मिळत आहे.

शाखेवरून राष्ट्रवादी सेना आमने सामने : काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट हे आमने सामने आले होते. येवढे नाही तर एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झाली होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावण्यानं अनुचित प्रकार झाला नाही आणि दोन्ही गट निघून गेले होते. जितेंद्र आव्हाड यांनी महसूल विभागाकडं जागे संदर्भात तक्रारी ही केली होती.

शाखेत आनंद दिघे बसले होते : मुंबईच्या या शाखेमध्ये आनंद दिघे हे देखील अनेकदा बसलेले होते. ही शाखा शिवसेना पक्षाची होती आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी शाखा कायम खुली राहत होती. मात्र, कालांतरानं इथल्या पदाधिकाऱ्यांनी या शाखेच्या जागेचा वापर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी केला आणि याची निघा न राखल्यामुळं ही शाखा अडगळीत पडलेली होती. तिला दुरुस्त करून आता आम्ही लोक उपयोगासाठी आणत आहोत, अशी भावना राजन किणे यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन! खैरेंना शुभेच्छा देत दानवेंची प्रचाराला सुरुवात करण्याची घोषणा - Sambhajinagar Lok Sabha Election
  2. भाजपाची शिवसेनेवर कुरघोडी? महायुतीत समन्वय असल्याचा संजय शिरसाट यांचा दावा - Lok Sabha Elections
  3. 'जेएनपीए'तून होणारी लाखो टन कांद्याची निर्यात शून्यावर, कांदा निर्यात बंदीचा निर्यातदारांसह वाहतूकदारांना मोठा फटका - Onion Export Ban

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.